Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंजीव सोशल फाउंडेशन च्या वतीने महिला पोलिसांचा सन्मान

संजीव सोशल फाउंडेशन च्या वतीने महिला पोलिसांचा सन्मान

पुणे : संजीव सोशल फाउंडेशन च्या वतीने महिला पोलिसांचा सन्मान करण्यात आला. मराठी संस्कृतीचे प्रतीक असलेली नथ आणि सन्मानपत्र देऊन १४५ महिला पोलिसांना सन्मानित करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष छाया संजीव गदादे, कृष्णाजी कोकाटे, डॉ. आरती वाघोले, अश्विनी रासकर, वर्षा इनामदार, संग्राम कामठे, स्मिता लडकत, अपूर्वा लडकत, राजकुमार घुगे यावेळी उपस्थित होते. समर्थ पोलीस ठाणे, हडपसर पोलीस ठाणे, फुरसुंगी पोलीस ठाणे आणि उरुळी कांचन पोलीस ठाणे या ठिकाणी कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला.

छाया गदादे म्हणाल्या, महिला पोलीस कर्मचारी या वर्षभर समाजासाठी काम करत असतात. आपले कुटुंब, घरातील लहान मूल, सण उत्सव या सगळ्यांना मागे ठेवून त्या आपले कर्तव्य पूर्ण करतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे आणि सोबतच आपली जबाबदारी पार पाडून त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे.

समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते, फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोगले, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी श्रीकांत कांचन, स्मिता गायकवाड, गजानन चव्हाण, दिपाली माटे, सोनल कोद्रे, पूजा सणस, सुरज साळुंखे, कल्पना बिडकर, पूजा मोरे, अभिषेक सागरे, जयश्री गदादे, सुभाष गदादे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments