Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedविश्व संवाद केंद्र आयोजित लेखन स्पर्धा: 'मी अनुभवलेला महाकुंभ'

विश्व संवाद केंद्र आयोजित लेखन स्पर्धा: ‘मी अनुभवलेला महाकुंभ’

पुणे -♦️विश्व संवाद केंद्र यांच्या वतीने लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ♦️
•विषय
* पर्यावरण आणि महाकुंभ
* सामाजिक सुरक्षा आणि महाकुंभ
* महाकुंभ व्यवस्थापन
* सामाजिक समरसता आणि महाकुंभ
* आपल्या परंपरा – आध्यात्मिक महत्त्व आणि महाकुंभ
* महाकुंभ आणि नागरिकांमधील जागृती
* महाकुंभ – आर्थिक उलाढालीचे केंद्र
* महाकुंभ आणि खगोलीय महत्त्व
* आध्यात्मिक पर्यटन आणि महाकुंभ
* हिंदू एकतेचा सहभाग आणि महाकुंभ
* आंतरराष्ट्रीय पातळीवरील दाखल – महाकुंभ
* महाकुंभात परदेशी नागरिकांचा सहभाग

🔹स्पर्धेच्या नियम आणि अटी

•केवळ पश्चिम महाराष्ट्रात निवास असलेल्या (पुणे , सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर , अहिल्यानगर , नाशिक तसेच येथील जिल्हा व तालुका स्तर) तसेच प्रयागराज येथे महाकुंभाला जाऊन आलेल्या व्यक्तीच या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

• वयोगट – दोन वयोगटांसाठी ही स्पर्धा आहे.

• गट -१: ५० वर्षाच्या आतील

• गट – २: ५० वर्ष व त्यापुढील

* वर दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर लेख लिहावा.

•शब्दमर्यादा: १००० शब्द

•लेखाच्या सुरुवातीला लेखाचे शीर्षक, स्पर्धेसाठीचा वयोगट, लेखकाचे नाव आणि जिल्हा दिलेले असावे.

•आपले लेख २५ मार्च पर्यंत सोबतच्या ईमेलवर वर्ड फाईल किंवा ओपन टेक्स्ट पाठवावे. ईमेल – vskpunemahakumbh@gmail.com

•स्पर्धेतील सहभाग नोंदणीसाठी रजिस्ट्रेशन १८ मार्च पर्यंत करावे.

•हाताने लिहिलेले लेख स्वीकारले जाणार नाहीत. शुद्धलेखन पाहिले जाईल.

•परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

•प्रत्येक गटात तीन विजेते क्रमांक काढले जातील.
प्रथम क्रमांक: रु १०००/-
द्वितीय क्रमांक: रु ७५०/-
तृतिय क्रमांक: रु ५००/-

•स्पर्धेतील उचित लेख आयोजकांकडून विविध माध्यमांत प्रसिद्ध करण्यात येतील.

•स्पर्धेला दिलेले लेख इतरत्र प्रसिद्ध करू नये.पूर्व प्रसिद्ध लेख पाठवू नये. स्पर्धा झाल्यावर सुद्धा विश्व संवाद केंद्राच्या पूर्व परवानगीशिवाय कुठेही लेख प्रसिद्धीला देता येणार नाहीत.

अधिक माहितीसाठी संपर्क – 9270098267 वेळ दु. १२ ते ३
स्पर्धेची माहिती आणि नोंदणी फॉर्म:

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeGuAj9c5Cwjr1OoOYtT-AOSVgy65KvCUdDFaJyRuf6M3qzdA/viewform?usp=header

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments