Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedबजाज अलियान्झ लाइफ’चा ‘फोकस्ड २५ फंड’ सादर; उच्च वाढीच्या संधी साधण्यासाठी संकेंद्रित...

बजाज अलियान्झ लाइफ’चा ‘फोकस्ड २५ फंड’ सादर; उच्च वाढीच्या संधी साधण्यासाठी संकेंद्रित पोर्टफोलिओचे धोरण

पुणे, ११ मार्च २०२५ : भारतातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असणाऱ्या बजाज अलियान्झ लाइफ या कंपनीने ‘बजाज अलियान्झ लाइफ फोकस्ड २५ फंड’ हा आपला नवीन फंड प्रस्ताव (एनएफओ) सादर केला आहे. हा फंड युनिट लिंक्ड विमा योजना (युलिप) उत्पादनांसोबत उपलब्ध असेल आणि दीर्घकालीन भांडवली वाढ साध्य करण्यासाठी २५ निवडक शेअर्सच्या पोर्टफोलिओवर आधारित असेल. यात प्रामुख्याने मोठी भांडवलक्षमता असलेल्या (लार्ज-कॅप) कंपन्यांवर भर देण्यात आला असून, सोबत आयुर्विम्याचे संरक्षणही मिळेल. हा फंड ‘निफ्टी १००’ या निर्देशांकावर आधारित आहे. त्यामुळे भारतातील अव्वल कामगिरी करणाऱ्या कंपन्यांशी या फंडाचा समन्वय साधला जाईल. ‘बजाज अलियान्झ लाइफ फोकस्ड २५ फंड’ हा ‘एनएफओ’ येत्या दि. २० मार्च २०२५ रोजी बंद होईल.

भारतीय अर्थव्यवस्था प्रगतीच्या, वाढीच्या दिशेने वाटचाल करत असताना, गुंतवणूकदारांनादेखील जोखीम व परतावा यांमधील संतुलन राखणारा गुणवत्तापूर्ण आणि सक्रियपणे व्यवस्थापित असा पोर्टफोलिओ हवा आहे. गुंतवणुकीच्या या विकसीत परिसंस्थेमध्ये ‘बजाज अलियान्झ लाइफ फोकस्ड २५ फंड’ हा दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी निवडक, मूलभूतदृष्ट्या सक्षम आणि सातत्यपूर्ण वाढीची क्षमता असलेल्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करून उच्च दर्जाचा जोखीम-समायोजित परतावा मिळवण्याचा प्रयत्न करील. हा फंड बाजारातील संधींचा लाभ घेण्यासाठी सक्रियपणे व्यवस्थापित केला जाईल आणि बदलत्या परिस्थितींना अनुकूल राहील. गुंतवणुकीचे सुस्पष्ट तत्त्वज्ञान आणि स्टॉक्सची विशिष्ट चौकट यांवर भर देत या फंडातील कंपन्यांची निवड करण्यात येईल. स्पर्धात्मकता, सुदृढ कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आकर्षक मूल्यांकन असलेल्या कंपन्यांवर यामध्ये भर दिला जाईल.

नवीन फंड सादर करण्याच्या निमित्ताने ‘बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स’चे मुख्य गुंतवणूक अधिकारी श्रीनिवास राव रवुरी म्हणाले, “गुंतवणूकदारांना भारताच्या आर्थिक प्रगतीचा लाभ घेता यावा, याकरीता त्यांना आम्ही ‘बजाज अलियान्झ लाइफ फोकस्ड २५ फंडा’च्या माध्य़मातून उच्च आत्मविश्वास असलेली गुंतवणुकीची रणनीती देऊ इच्छितो. संशोधनावर आधारलेल्या आमच्या शिस्तबद्ध दृष्टिकोनामुळे गुंतवणूकदारांना मूलभूतदृष्ट्या सक्षम आणि भक्कम कंपन्यांच्या यशाचा भाग बनता येईल. दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याच्या त्यांच्या धोरणास यातून मदत होईल. हा फंड २५ निवडक शेअर्समध्ये गुंतवणूक करेल. त्यात प्रामुख्याने मोठ्या कंपन्या असतील. फंडाची वाटचाल गतिशील होण्याच्या दृष्टीने त्यातील सर्वच कंपन्यांची निवड क्षेत्र आणि बाजार भांडवल मर्यादांचा विचार न करता केवळ गुणवत्तेवरच करण्यात येईल.”

सुस्पष्ट रणनीती आणि निवडक शेअर्सच्या संकेंद्रित पोर्टफोलिओ असे स्वरूप असलेला, युलिप उत्पदनांशी संबंधित असलेला ‘बजाज अलियान्झ लाइफ फोकस्ड २५ फंड’ जोखीम घेण्याची मोठी क्षमता असलेल्या, दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू इच्छिणाऱ्या गुंतवणुकदारांसाठी अगदी योग्य आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments