● या प्रकल्पातून आयटी, रिटेल विक्री, बीपीओ आणि बीएफएसआय अशा प्रचंड मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये रोजगारक्षमता प्रशिक्षण दिले जाईल आणि महिलांना करियरच्या अर्थपूर्ण संधी शोधण्यास मदत केली जाईल.
● तांत्रिक कौशल्यांबरोबरच यामुळे महिलांना महत्त्वाची जीवनकौशल्ये, आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याच्या क्षमतांसह सक्षम केले जाईल. त्यामुळे त्यांना वैयक्तिक व व्यावसायिक आव्हानांचा सामना प्रभावीपणे करता येईल.
बंगळुरू ११ मार्च २०२५: फ्लिपकार्ट फाऊंडेशन या फ्लिपकार्ट ग्रुपच्या चॅरिटेबल विभागाने विप्ला फाऊंडेशनसोबत भागीदारी केली असून त्याद्वारे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देऊन लिंगाधारित हिंसाचाराप्रति त्यांचा धोका कमी करण्यासाठी रोजगारक्षम कौशल्यांद्वारे सक्षमीकरण केले जाईल. ‘महिलांच्या लिंगाधारित हिंसाचाराप्रति धोका कमी करण्यासाठी रोजगारक्षम कौशल्य हस्तक्षेपांद्वारे आर्थिक स्वातंत्र्य’ या प्रकल्पातून कौशल्य विकास किंवा बाजारयोग्य व्यवसायांमध्ये पुनर्कौशल्य साध्य करण्यासाठी प्रेरित केले जाईल आणि त्यांच्या क्षमता व रोजगाराच्या संधींमधील अंतर दूर केले जाईल. पुण्यातील झोपडपट्टी विभागांमध्ये अंमलात आणलेल्या या प्रकल्पातून महिलांना अर्थपूर्ण, शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या उत्तम करियरच्या संधी मिळतील. त्यातून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना अनेक वर्षांचे दारिद्र्य आणि छळ यांचे चक्र भेदण्यासाठी मदत मिळू शकेल.
या प्रकल्पाची अंमलबजावणी पुणे जिल्ह्यातील विप्ला फाऊंडेशन या संस्थेकडून केली जाईल. येथील महिलांना आयटी, रिटेल विक्री, बीपीओ आणि बीएफएसआयसारख्या प्रचंड मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये सर्वांगीण प्रशिक्षण मिळू शकेल. या प्रकल्पातून पुण्यातील झोपडपट्टी, ग्रामीण आणि निमग्रामीण परिसरांमधील २०० तरूण महिलांना प्रशिक्षण दिले जाईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर यातील सहभागींना त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रातील प्रमाणपत्र मिळेल. फ्लिपकार्ट फाऊंडेशन आणि विप्ला फाऊंडेशन यांचे उद्दिष्ट आर्थिक स्वयंपूर्णता आणि तग धरून ठेवण्याची क्षमता निर्माण करून दीर्घकालीन बदल घडवण्याचे आहे. महिलांना आपले कुटुंब आणि समाजात योगदान देण्यासाठी उत्तम संधी मिळतील आणि शाश्वत करियर उभारता येईल याची खात्री करण्याचे ध्येय आहे.
या उपक्रमाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या मुख्य कार्यक्रमात मार्गदर्शन, तांत्रिक आणि जीवन-कौशल्य प्रशिक्षण, उद्योगांना भेटी शक्य करणे आणि नोकरीच्या ठिकाणी नियुक्ती यांचा समावेश आहे. या प्रकल्पातून नोकरी दिल्यानंतर पाठिंब्यावरही काम केले जाते. त्यामुळे त्यांना मनुष्यबळात प्रवेश मिळेल आणि त्यांची करिअरमधील वाढ टिकून राहील. या भागीदारीमुळे कुटुंबे आणि समाजातील अप्रत्यक्ष लाभार्थींसह १,२०० व्यक्तींना फायदा होईल.
या समन्वयाबाबत बोलताना फ्लिपकार्टच्या कॉर्पोरेट कामकाज जनसंपर्क विभागाच्या उपाध्यक्ष सारा गिडेन म्हणाल्या की, “फ्लिपकार्ट फाउंडेशनमध्ये खरे सक्षमीकरण कौशल्य विकासापुरतेच मर्यादित नाही यावर आम्ही विश्वास ठेवतो. महिलांना त्यांच्या आकांक्षा, आर्थिक सुरक्षितता आणि सामाजिक भूमिकांबाबत पुन्हा अधिकार मिळवण्यास सक्षम करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. विप्ला फाउंडेशनसोबतचे आमचे सहकार्य महिलांना योग्य संधी दिल्या जातात तेव्हा त्यांचे जीवन बदलते आणि त्या कुटुंब आणि समाजात बदलासाठी प्रेरक बनतात या विश्वासावर आधारित आहे. हा उपक्रम केवळ मनुष्यबळ सुसज्जतेपुरता मर्यादित नाही तर तो लवचिकता, आत्मविश्वास आणि दीर्घकालीन सामाजिक-आर्थिक गतिशीलता वाढवणारा आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हानांना तोंड देण्यासाठी महिलांना साधनांसह सुसज्ज करून आम्ही अशा भविष्यात गुंतवणूक करतो जिथे आर्थिक स्वातंत्र्य अधिक समतापूर्ण समाजात रूपांतरित होते.”
विप्ला फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद निगुडकर म्हणाले की, “महिलांना कौशल्यपूर्ण बनवणे म्हणजे फक्त संधी निर्माण करणे नाही तर त्यांच्या नेतृत्वाच्या, प्रेरित करण्याच्या आणि समाजात आमूलाग्र बदल करण्याच्या अमर्याद क्षमता उलगडणे हे आहे. महिलांना रोजगार कौशल्ये आणि आर्थिक संधी मिळवून देण्यासाठी फ्लिपकार्ट फाउंडेशनच्या वचनबद्धतेबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या योगदानामुळे महिलांना आयुष्यातील अडथळे दूर करण्यास, आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यास आणि स्वतःसाठी व आपल्या कुटुंबासाठी उज्ज्वल भविष्य घडविण्यास मदत होईल.”
मागील वर्षभरात फ्लिपकार्ट फाउंडेशनने आंध्र प्रदेश, आसाम, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये व्याप्ती वाढवून शाश्वत परिणाम साध्य करण्यासाठी विविध हस्तक्षेप वापरले आहेत. त्यांनी समाजातील वंचित घटकांची सेवा, आधार आणि सक्षमीकरण करण्यासाठी काम केले आहे.
फ्लिपकार्ट फाऊंडेशन आणि विप्ला फाऊंडेशनचा रोजगारक्षमता कौशल्य प्रशिक्षणाद्वारे महिलांच्या सक्षमीकरणासाठी समन्वय
RELATED ARTICLES


