Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे शहर तहसील कार्यालयाच्यावतीने 17 मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

पुणे शहर तहसील कार्यालयाच्यावतीने 17 मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

पुणे, दि. 11 : पुणे शहर तहसील कार्यालयाच्यावतीने 17 मार्च 2025 रोजी सकाळी 10.00 ते 5.00 या कालावधीत पिंगळे वस्ती मुंढवा येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

मा. मुख्यमंत्री यांनी सामान्य नागरिकांचे दैनदिन जीवन सुकर व्हावे याकरीता सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. याअंतर्गत नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासोबतच त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिवस हा शासन आपले दारी म्हणून आयोजित करण्यात करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी लोकशाही दिनाच्या दिवशीच आपल्या समस्याबाबत लेखी स्वरुपात अर्ज सादर करावेत, असे आवाहन पुणे शहरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments