Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणेस्थित उद्योजक रणजित मोरे यांनी बांधकाम क्षेत्रातील यांत्रिकीकरण या विषयावर लिहिलेल्या पुस्तकाचे...

पुणेस्थित उद्योजक रणजित मोरे यांनी बांधकाम क्षेत्रातील यांत्रिकीकरण या विषयावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन

बिल्डींग थ्रु टाईम या पुस्तकाद्वारे बांधकाम सामग्री उद्योगात तरूणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

 

पुणे,31 जानेवारी 2024 : पुणेस्थित उद्योजक रणजित मोरे यांनी बांधकाम क्षेत्रातील यांत्रिकीकरण या विषयावर लिहिलेल्या बिल्डींग थ्रु टाईम या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच हैदराबाद येथील नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ कन्स्ट्रक्शन येथे आयोजित ऑल इंडिया बिल्डर्स कन्व्हेंशन या कार्यक्रमात करण्यात आले.याप्रसंगी तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमआरका यांसह बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) चे राष्ट्रीय अध्यक्ष एस.एन.रेड्डी,माजी अध्यक्ष आर.राधाकृष्णन् व बी सिनाया आदी मान्यवर उपस्थित होते.ऑल इंडिया बिल्डर्स कन्व्हेंशन या कार्यक्रमाला केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंग चौहान आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवांथ रेड्डी यांनी देखील भेट दिली.याप्रसंगी दोन्ही मान्यवरांना हे पुस्तक भेट देण्यात आले.

 

या पुस्तकाच्या माध्यमातून प्राचीन काळापासून ते आधुनिक बांधकामांपर्यंतच्या प्रवासाबाबत अंर्तदृष्टी मिळेल.महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये वापरलेली यंत्रसामग्री आणि साधने व या सामग्रींमध्ये झालेली प्रगती व आधुनिकीकरण आणि त्याचा आधुनिक काळातील प्रकल्पांवर होणारा परिणाम याबाबत माहिती देण्यात आली आहे.याशिवाय विद्यार्थी,उद्योगातील कार्यरत व्यावसायिक आणि या क्षेत्रामध्ये रस असलेल्या लोकांना कृत्रिम बुध्दिमत्तेसह यंत्रसामग्रीचे भविष्य व बांधकामातील यांत्रिकीकरण प्रक्रिया याबाबत माहिती देण्यात आली आहे.

 

रणजित मोरे यांना बांधकाम उद्योगातील यांत्रिकीकरण आणि उपकरणांच्या जगात तीन दशकांहून अधिक अनुभव आहे.उद्योग क्षेत्रात योगदान देण्याच्या अथक प्रयत्नांत ते नेहमीच विविध संघटनांमध्ये सक्रीय असतात.बीएआयच्या पुणे चॅप्टरचे सर्वांत तरूण अध्यक्ष म्हणून त्यांची या उद्योगात ओळख आहे.बांधकाम उपकरण उद्योगात आपले करिअर बनवू इच्छिणार्‍यांसाठी व या उद्योगात कार्यरत असलेल्या व्यावसायिकांसाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भ ठरेल.

 

रणजित मोरे म्हणाले की,बांधकाम उद्योगात यांत्रिकीकरण अपरिहार्य आहे आणि ते सतत विकसित व सुधारित राहिल.वेगवान जगात यांत्रिकीकरण हे गुणवत्ता,अचूकता आणि गती प्रदान करते.बांधकाम उद्योगात निर्णायक भूमिका बजावत असून देखील याबाबत समाजात पुरेशी जागरूकता नाही.हे पुस्तक म्हणजे यादृष्टीने केलेला प्रयत्न

आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments