Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedरमणबाग शाळेत श्रमसंस्कारद्वारे आद्य संस्थापक विष्णुशास्त्री चिपळूणकरांना अभिवादन*

रमणबाग शाळेत श्रमसंस्कारद्वारे आद्य संस्थापक विष्णुशास्त्री चिपळूणकरांना अभिवादन*

 

 

शनिवार दिनांक 17 मार्च 2025 रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत आद्य संस्थापक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा स्मृतिदिन ‘श्रमसंस्कार दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.

अनेक वर्षांची ही परंपरा गेले काही वर्षे खंडित झाली होती.या वर्षी पुन्हा एकदा

या दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून हा दिन साजरा करून विष्णुशास्त्रींचे पुण्यस्मरण केले गेले.सर्व वर्ग खोल्या, व्हरांडे, प्रयोगशाळा,ग्रंथालय, कार्यालय,प्रशालेचे आवार,मैदान यांची शिक्षक व विद्यार्थी मिळून सर्वांनी स्वच्छता केली.शाळाप्रमुख सौ.चारुता प्रभुदेसाई यांनी प्रास्ताविकातून विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे योगदान सांगून श्रमसंस्काराचे आयुष्यातील महत्त्व यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व पदाधिकारी श्रीमती प्रभुदेसाई,श्री टोले,श्रीमती गोरे व शेलुकर तसेच शिक्षक श्री महेश जोशी आणि सर्व शिक्षक यांनी या उपक्रमाचे नियोजन करून मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments