Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedएरंडवणे ज्येष्ठ नागरिक संस्था आयोजित जी पी सहस्रबुद्धे चषक एकेरी कॅरम स्पर्धेस...

एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संस्था आयोजित जी पी सहस्रबुद्धे चषक एकेरी कॅरम स्पर्धेस सुरवात   – ११२ स्पर्धकांचा सहभाग — – – मा.केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे हस्ते उद्घाटन

 

पुणे

(क्रीडा प्रतिनिधी)

“ज्येष्ठ नागरिकांनी आनंदमयी जीवन जगण्यासाठी आपल्या आवडत्या क्रीडा स्पर्धा मध्ये नेहमी भाग घ्यावा,सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हावे व समाज जीवनाचा आनंद घ्यावा”.

सुदृढ आरोग्यासाठी नियमित व्यायाम व योगा बरोबरच कॅरम सारख्या क्रीडा स्पर्धेबरोबरच इतर छंद जोपासवे.क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन नियमित सराव वाढवावा”.असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित *जी पी सहस्रबुद्धे* चषक एकेरी कॅरम स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.याप्रसंगी कॅरम पटू विलास सहस्रबुद्धे,माधुरी सहस्रबुद्धे,एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संस्थांचे अध्यक्ष अजित गोखले,सचिव उर्मिला शेजवलकर ह्यांची मुख्य उपस्थिती होती.प्रमुख पाहुण्यांचा परिचय कार्याध्यक्षा प्राजक्ता मोघे ह्यांनी करून दिला. अध्यक्ष अजित गोखले यांनी पाहुण्यांचे पुषगुच्छ देऊन स्वागत केले.

 

पटवर्धन बाग येथील जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात ज्येष्ठ नागरिकांच्या ह्या एकेरी कॅरम स्पर्धेला सुरुवात झाली असून पुणे शहरांतून ११२ स्पर्धक यात भाग घेत आहेत.स्पर्धा दररोज बाद पद्धतीने घेण्यात येत असून सकाळी दहा ते साडे सहा या वेळेत संपन्न होत आहेत.२० ते २३ मार्च दरम्यान चालणाऱ्या ह्या कॅरम स्पर्धा बघण्यास गर्दी होत आहे.

स्पर्धा प्रमुख शिरीष जोशी,मुख्य पंच अभय अटकेकर यांचेबरोबर सतीश सहस्रबुद्धे,पंकज कुलकर्णी,माधव तिळगुळकर, सुनील वाघ,रामकुमार ठाकूर हे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

आजच्या स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे

१) पंकज कुलकर्णी वि वि नंदकुमार झगडे (२२- १५,२५- ८),

२) सुनील शेजवलकर वि वि सुब्रमण्यम अय्यर (१६-१३,२२-६)

३)सतीश सहस्रबुद्धे वि वि माधव देशमुख (१६- ११,९- २६,१४- ७)

४)अजित गोखले वि वि सुभाष चव्हाण (१८- २,१९- ७)

५) मिलिंद रानडे वि वि पद्माकर मेढेकर (१४-११,१३-१२)

६)माधव तिळगुळकर वि वि अलकनंदा भानू ( २५-०,२५-०)

७)शुभदा गोडबोले वि वि भारती आगाशे (१७- ५,१७- ७),

८)शिरीष जोशी वि वि हेमा मांडके (९- १४,२१- ६,१६-५)

९)वसंत रत्नपारखी वि वि अरविंद देशपांडे ( २२- ४,२०- ४)

१०)सुनील वाघ वि वि मकरंद बेहरे (२१- ०,२१- ०)

— ————–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments