Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorized*प्रभात मित्र मंडळाच्या वतीने वेशभूषा व नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद*   विविध...

*प्रभात मित्र मंडळाच्या वतीने वेशभूषा व नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद*   विविध वयोगटातील स्पर्धकांचे उत्कृष्ट सादरीकरण

 

पुणे : प्रभात मित्र मंडळाच्या वतीने ऐतिहासिक वेशभूषा वक्तृत्व स्पर्धा आणि पारंपरिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध वयोगटांतील स्पर्धकांनी उत्कृष्ट सादरीकरण करत आपली कला सादर केली. स्पर्धेत अनुज पाटणे, सक्षम वरदेकर, श्रावण पानकर, स्वामिनी बडदे, मधुरा राजीवडे, आरोही राजपूत यांच्यासह अनेक स्पर्धकांनी बाजी मारली.

 

स्पर्धेचे आयोजन गुरुवार पेठेत करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सचिव उदय वाडेकर, खजिनदार सचिन भोसले, उत्सव प्रमुख नितीन घोगरे, अमोल व्यवहारे हेमराज साळुंखे अमोल थोरात यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

 

ऐतिहासिक वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धेत छोट्या गटात अनुज पाटणे, सक्षम वरदेकर, अनघा काची, मध्यम गटात श्रावण पानकर, शौर्य टेकवडे, मनस्वी दोडला, मोठ्या गटात स्वामिनी बडदे, श्रीपाद नुल्ला, मनस्वी कदम हे प्रथम तीन क्रमांकाचे विजेते ठरले.

 

पारंपरिक नृत्य स्पर्धेत छोट्या गटात स्वरा रायरीकर, आरोही तांबे, शार्विका जाधव, मोठ्या गटात मधुरा राजीवडे, आरोही राजपूत, स्वरा परदेशी, समूह नृत्यात अंश पाटणे, मनस्वी दोडला, ओवी यंदे , अक्षदा महाडीक, रुद्रा डोके, अनुज पाटणे, वेदश्री दोडला यांनी प्रथम तीन क्रमांक पटकाविले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments