पुणे, मार्च २१, २०२५: नाइट फ्रँक इंडियाने आपल्या नवीन अहवालामध्ये नमूद केले की, फेब्रुवारी २०२५ मध्ये पुण्यातील रिअल इस्टेट बाजारपेठेत १९,०१२ मालमत्तांच्या नोंदणीची नोंद झाली. वार्षिक आधारावर नोंदणी स्थिर राहिल्या, जेथे माफक वार्षिक १ टक्क्याची वाढ झाली. मासिक विश्लेषण नोंदणींमध्ये ९ टक्क्यांची वाढ झाली.
शहराने फेब्रुवारी २०२५ मध्ये मालमत्ता नोंदणींमधून मुद्रांक शुल्क संकलनांमध्ये ७१२ कोटी रूपयांचा महसूल गोळा केला, ज्यामध्ये वार्षिक ७.६ टक्क्यांची आणि मासिक १२ टक्क्यांची वाढ झाली. मुद्रांक शुल्क महसूलामधील ही वाढ व्यवहारांच्या उच्च प्रमाणामुळे झाली, ज्यामध्ये १ कोटी रूपये व त्यापेक्षा अधिक किमतीच्या मालमत्तांचा समावेश होता.
पुण्यातील गृहनिर्माण मागणीला सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकासाचा, तसेच इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत संबंधित किफायतशीरपणा व प्रबळ गृहखरेदीदार भावनेचा पाठिंबा मिळत आहे.
मालमत्ता नोंदणी, मालमत्तेचे मूल्य आणि मुद्रांक शुल्क संकलन
Year
Month
Total Registration
Stamp Duty Collection
(INR Cr)
2024
January
17,786
589
2024
February
18,791
662
2024
March
22,189
822
2024
April
14,244
566
2024
May
12,280
440
2024
June
14,690
545
2024
July
13,731
521
2024
August
13,645
599
2024
September
11,056
508
2024
October
20,894
751
2024
November
13,371
475
2024
December
17,348
620
2025
January
17,449
638
2025
February
19,012
712
स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च, महाराष्ट्र सरकार – नोंदणी व मुद्रांक विभाग (आयजीआर)
मालमत्ता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क संकलन
Period
Registrations (Units)
Stamp duty collection (INR cr)
Feb-24
18,791
662
Feb-25
19,012
712
YoY Change
1%
7.6%
फेब्रुवारी २०२५ मध्ये १ कोटी रूपये व त्यापेक्षा उच्च मूल्य असलेल्या सदनिकांसाठी मागणी वाढली
१ कोटी रूपये व त्यापेक्षा उच्च मूल्य असलेल्या घरांसाठी मागणी वाढली आहे, जेथे सेगमेंटचे प्रमाण फेब्रुवारी २०२४ मधील १४ टक्क्यांवरून फेब्रुवारी २०२५ मध्ये १६ टक्क्यांपर्यंत वाढले. या बदलामधून पुण्यातील रिअल इस्टेट बाजारपेठेमधील प्रीमियम घरांसाठी वाढती पसंती दिसून येते.
निवासी मालमत्ता व्यवहारांसाठी तिकिट आकाराचे प्रमाण
Ticket size
Share in Feb 2024
Share in Feb 2025
Under INR 25 lakhs
22%
22%
INR 25 – 50 lakhs
30%
30%
INR 50 lakhs – 1 Cr
32%
32%
INR 1 Cr – 2.5 Cr
13%
14%
INR 2.5 Cr – 5 Cr
1%
2%
Over 5 Cr
<=1%
<=1%
स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च, महाराष्ट्र सरकार – नोंदणी व मुद्रांक विभाग (आयजीआर)
नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजाल म्हणाले, “पुण्यातील रिअल इस्टेट बाजारपेठ स्थिर राहिली, जेथे फेब्रुवारी २०२५ मध्ये १९,०१२ मालमत्ता नोंदणींची नोंद झाली. उच्च मूल्य असलेल्या, विशेषत: १ कोटी रूपयांपेक्षा अधिक मूल्य असलेल्या घरांसाठी वाढत्या मागणीमधून प्रीमियम सेगमेंटवर ग्राहकांचा प्रबळ आत्मविश्वास दिसून येतो. मोठ्या घरांसाठी मागणी वाढत आहे, ज्याचे श्रेय सर्वसमावशेक जीवनशैली प्राधान्य व किफायतशीरपणाला जाते, तसेच सुरू असलेल्या पायाभूत सुविधा सुधारणांचा देखील पाठिंबा मिळत आहे. हे ट्रेण्ड्स गृहखरेदीदारांसाठी स्थिर व आकर्षक गंतव्य म्हणून पुण्याचे स्थान अधिक दृढ करतात.”
मोठ्या सदनिकांसाठी उच्च मागणी कायम
मोठ्या सदनिकांसाठी मागणी प्रबळ आहे, जेथे ८०० चौरस फूटांहून अधिक जागा असलेल्या सदनिकांचे प्रमाण फेब्रुवारी २०२४ मधील २४ टक्क्यांवरून फेब्रुवारी २०२५ मध्ये ३२ टक्क्यांपर्यंत वाढले. या ट्रेण्डमधून महामारीनंतर देखील मोठ्या सदनिकांसाठी सतत मागणी होत असल्याचे दिसून येते.
निवासी मालमत्ता व्यवहारांसाठी क्षेत्राचे प्रमाण
Area in sq ft
Share in Feb 2024
Share in Feb 2025
Under 500
35%
23%
500-800
41%
45%
800-1000
11%
15%
1000- 2000
12%
14%
Over 2000
1%
3%
स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च, महाराष्ट्र सरकार – नोंदणी व मुद्रांक विभाग (आयजीआर)
फेब्रुवारी २०२५ मध्ये सेंट्रल पुण्यामध्ये एकूण निवासी व्यवहारांपैकी ७६ टक्के व्यवहारांची नोंद
फेब्रुवारी २०२५ मध्ये हवेली तालुका, पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांचा समावेश असलेल्या सेंट्रल पुणेने निवासी व्यवहारांमधील अग्रस्थान कायम राखले, ज्याचे बाजारपेठेत ७६ टक्क्यांचे योगदान होते. असे असताना देखील हे प्रमाण गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत काहीसे कमी झाले, तसेच शहरातील इतर भागांमधील उदयोन्मुख विकास पुण्यातील गृहखरेदीदारांच्या सतत बदलत असलेल्या गरजांची पूर्तता करत आहेत. मावळ, मुळशी व वेल्हे यांसारख्या भागांचा समावेश असलेल्या पश्चिम पुणेने निवासी व्यवहारांमध्ये १२ टक्क्यांसह दुसरे सर्वात मोठे प्रमाण सुनिश्चित केले. तसेच याच कालावधीदरम्यान उत्तर, दक्षिण व पूर्व पुणेचे एकत्रित निवासी व्यवहारांमध्ये प्रमाण ११ टक्के होते.
निवासी मालमत्ता व्यवहारांसाठी सूक्ष्म बाजारपेठांचे प्रमाण
Micro market
Share in Feb 2024
Share in Feb 2025
North
5%
6%
South
3%
4%
East
2%
1%
West
12%
12%
Central
78%
76%
स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च, महाराष्ट्र सरकार – नोंदणी व मुद्रांक विभाग (आयजीआर)
Micro Markets
Zone
Taluka
North
Junnar, Ambegaon, Khed
South
Bhor, Purandhar, Baramati, Indapur
East
Shirur, Daund
West
Mawal, Mulshi, Velhe
Central
Haveli, Pune city (Pune Municipal corporation (PMC) & Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC))


