पुणे,26 मार्च 2025 : मॅरिएट हॉटेल्स तर्फे उत्तराखंडमध्ये जिम कॉर्बेट मॅरिएट रिसोर्ट ॲन्ड स्पा सुरू केल्याची घोषणा करण्यात आली आहे.घनदाट जंगल आणि कोसी नदीच्या काठावर असलेले हे हॉटेल निसर्ग आणि स्थानिक अनुभवांचा जणू प्रवेशद्वार आहे.ग्राहक रोमांचक जंगल सफारी,नदीकाठी शांततेत निसर्गाचा फेरफटका,पक्षी निरीक्षण सहली आणि कुमाउनी क्युझिनचा आनंद घेऊ शकतात.


