पुणे, २६ मार्च २०२५ : एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे येथे दि.1 ते 5 एप्रिल 2025 दरम्यान दु. 2.30 ते 5.00 या वेळेत मधुमेहाच्या रुग्णांसाठी “विनामूल्य डायबेटिक नेफ्रोपॅथी तपासणी व सल्ला शिबीर” आयोजित करण्यात आले आहे. शिबिरामध्ये डायबेटॉलॉजिस्ट आणि नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टरांकडून तपासणी व सल्ला विनामूल्य असेल. तसेच निदानासाठी आवश्यक तपासण्या 50% सवलतीत केल्या जाणार आहेत.याबरोबरच योग्य आहार आणि जीवनशैलीविषयी मार्गदर्शन,मधुमेही रुग्णांसाठी विशेष आरोग्य टिप्स आणि शास्त्रोक्त पद्धतीचे पूरक उपचार आयुर्वेद व योग यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
मधुमेहामुळे दीर्घकाळ रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त राहिल्यास किडनीवर ताण येतो आणि हळूहळू तिचे कार्य बिघडते. याला डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणतात. यामुळे किडनी निकामी होऊ शकते, ज्यामुळे डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांटची गरज भासू शकते यासाठी वेळीच निदान करून यावर उपचार घेणे गरजेचे असते. सतत थकवा आणि अशक्तपणा, लघवीत फेस किंवा रक्त दिसणे, पाय आणि चेहऱ्यावर सूज,वारंवार लघवीला जाण्याची गरज, रक्तदाबाचा सतत वाढता त्रास अशी लक्षणे आढळत असल्यास शिबिरास जरूर भेट द्या.
शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे -संपर्क – 020-67029100


