पुणे, कमरेखालील विनोद करणाऱ्या रिल स्टार्स तसेच फेसबुकवर समाजात तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या ना योग्य समज देण्याबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना निवेदन दिले आहे.
सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राजकीय व्यंगात्मक टिप्पणी चा विषय गाजतो आहे व त्याबद्दल समाजात (सार्वत्रिक) तीव्र प्रतिक्रिया व पडसाद उमटत आहेत.
अश्यातच इंस्टाग्राम वर लोकप्रियतेसाठी व पैसा कमविण्याच्या उद्देश्याने अनेक रील स्टार्स धुमाकूळ घालत आहेत.
योग्य कंटेन्टच्या अभावाने आणि लाईक्स ची हवा डोक्यात गेल्याने काही रील स्टार कमरेखालील असभ्य विनोदावर भर देत आहेत.
तसेच फेसबुक च्या माध्यमातून व्यक्त होताना किंवा विशिष्ट विषयावर टीका टिप्पणी करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मर्यादाभंग होत असताना दिसून येत आहे. आपले मत ज्यांना पटत नाही त्यांना शिव्यांची लाखोली वाहण्याचेही प्रकार निदर्शनास येत आहेत. अश्या प्रकरणात सभ्य समाजातील नागरिक तक्रार करण्यास अनुत्सुक असतात मात्र खासगीत ते यावर नाराजी नापसंती व्यक्त करतात. भविष्यात अश्या रील्स मुळे किंवा फेसबुक पोस्ट मुळे समाजात तेढ निर्माण होईल अथवा संघर्ष होण्याची शक्यता दिसून येते. तरी आपण सायबर सेल ला इन्स्टा वरील रील स्टार्स च्या असभ्य रील आणि फेसबुक वरील अनुचित पोस्ट तपासून त्या बाबत योग्य कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना द्याव्यात. भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पोलीस खात्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी अशी आग्रही मागणी करत आहे.
आपला,
संदीप खर्डेकर.
मो 9850999995.
✅️ *महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता* ,भारतीय जनता पार्टी .🪷🎙️
✅ *समन्वयक, महायुती*, पुणे शहर,ग्रामीण व जिल्हा .🤝
✅️मा.अध्यक्ष ,संचालक,उद्यम विकास सहकारी बॅंक.⚙️
✅️अध्यक्ष, क्रीएटिव्ह फौंडेशन.💢
✅️ट्रस्टी, कर्वे समाज सेवा संस्था.💯
✅️संचालक,Hi5 ब्रॉडबॅंड सोल्यूशन्स.🛜
✅️प्रोप्रायटर,प्रणेती ईस्टेट कंसल्टंटस💰
✅️ पंचरत्न कॅन्स्ट्रक्शन, बांधकाम व्यवसायिक.🏠
✅️ संचालक, मॅगनम सोलर पॉवर.🌞
✅संस्थापक,ॲलर्ट (एन जी ओ ).🌈
✅️ अध्यक्ष, रोलबॉल संघटना महाराष्ट्र. 🏀🙏


