Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedMES society माध्यमिक शाळा सासवड , 119 वा वर्धापन दिन बुधवार ,दिनांक...

MES society माध्यमिक शाळा सासवड , 119 वा वर्धापन दिन बुधवार ,दिनांक 26 मार्च 2025 शाळेच्या मैदानावर भव्य आणि दिमाखदार सोहळा साजरा

MES society माध्यमिक शाळा सासवड , 119 वा वर्धापन दिन बुधवार ,दिनांक 26 मार्च 2025 शाळेच्या मैदानावर भव्य आणि दिमाखदार सोहळा साजरा झाला

या निमित्ताने 1967 बॅच मधील माजी विद्यार्थी म्हणून सर्वप्रथम श्री नंदकुमार ब्रह्मे ,आणि श्री रमेश पुरंदरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेतर्फे निमंत्रित करण्यात आले.

समारंभाकरिता MES Society चे पदाधिकारी पुण्याहून विशेष प्रतिनिधी म्हणून आले होते. मा.श्री पुरोहित यांचे हस्ते श्री ब्रह्मे व मा.श्री भोसले सर यांचे हस्ते श्री पुरंदरे यांना सन्मानित करण्यात आले.

मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी सर्वांचे यथोचित स्वागत केले.

या प्रसंगी विविध प्रकारचे कार्यक्रम विद्यार्थी बाल मित्रांनी उत्फूर्तपणे सादर केले.

शाळेच्या मुख्याध्यापक,सर्व पदाधिकारी शिक्षक, स्टाफ व विद्यार्थ्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय असल्याचे दिसून आले.

कार्यक्रम अप्रतिम, सुनियोजित आणि आटोपशीर करण्यात आला.

 

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments