भारत, २२ मार्च २०२५: टाटा आयपीएल २०२५ चा थरार सुरु होत आहे, गेम्स२४X७ चा आघाडीचा फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म माय११सर्कल आपले नवीन कॅम्पेन ‘सर्कल में आजा’ सह क्रिकेटप्रेमींचा उत्साह अनेक पटींनी वाढवण्यासाठी सज्ज आहे. या कॅम्पेनमधून इमर्सिव्ह अनुभव, ब्रँड अम्बॅसॅडर्स यांच्यासह युजर्सचे खेळासोबत असलेल्या नात्याची नवी व्याख्या रचण्याची आपली परंपरा माय११सर्कलने कायम राखली आहे आणि खेळाडूंना खेळातील जोश आणि उत्साह वाढवण्यासाठी आमंत्रित केले आहे.
गेम्स२४X७ चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री सरोज पाणिग्रही यांनी कॅम्पेन लॉन्चच्या वेळी सांगितले, “आम्ही जे काही करतो ते आमच्या युजर्सच्या आनंदासाठी आणि या खेळावर त्यांचे जे प्रेम आहे ते वाढवण्यासाठी असते. आमचा प्लॅटफॉर्म जास्तीत जास्त इमर्सिव्ह असावा आणि खेळाडूंना याठिकाणी जास्तीत जास्त बक्षिसे जिंकता यावीत ही आमची इच्छा आहे.
टाटा आयपीएल ही फक्त एक स्पर्धा नाही तर एक भावना आहे जी लाखो क्रिकेटप्रेमींना एकत्र जोडते आणि आमच्या नवीन कॅम्पेनमध्ये आम्ही क्रिकेटविषयीचे प्रेम पुढच्या स्तरावर घेऊन जात आहोत. क्रिकेटविषयीच्या गतकाळातील आठवणी आणि चाहत्यांचे सर्वात आवडते क्षण एका ताज्याटवटवीत करणाऱ्या, प्रभावी पद्धतीने प्रस्तुत करून आम्ही असा अनुभव निर्माण करत आहोत जो युजर्सना फँटसी क्रिकेट जगामध्ये घेऊन जाईल. आमच्या सर्वसमावेशक ३६० डिग्री मार्केटिंग धोरणानुसार मैदानाच्या आत आणि बाहेर देखील धोरणात्मक भागीदारी करण्यात आल्या आहेत, यामध्ये टीव्ही, डिजिटल इत्यादींचा समावेश आहे. संपूर्ण आयपीएल सीझनमध्ये युजर्सचा उत्साह जास्तीत जास्त वाढावा आणि ब्रँड मजबूत होत राहावा हा आमचा प्रयत्न आहे.”
‘सर्कल में आजा’ – चाहत्यांना जास्तीत जास्त आयपीएल ऍक्शनचा लाभ
अतिशय आकर्षक सहा जाहिरात फिल्म्समधून हे कॅम्पेन प्रस्तुत करण्यात आले आहे, प्रत्येकाची हेडलाईन एक क्रिकेटिंग सुपरस्टार आहे. या कॅम्पेनमध्ये माय११सर्कलचे ब्रँड अम्बॅसॅडर्स आणि क्रिकेट स्टार्स जसे की, सौरव गांगुली, शुभमन गिल, मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग आणि यशस्वी जयस्वाल यांचा सहभाग आहे. याची संकल्पना वासन बाला यांनी तयार केली असून द स्क्रिप्ट रूम या क्रिएटिव्ह एजन्सीने त्यांची निर्मिती केली आहे. कॅम्पेनमधील प्रत्येक फिल्ममध्ये अतिशय अनोखा व स्वप्नवत वाटावा असा क्षण आहे ज्यामध्ये खेळाडू आश्चर्यकारक पद्धतीने चाहत्याच्या फँटसी टीममध्ये जाऊन पोहोचतो.
माय११सर्कलने आपल्या अम्बॅसॅडर्सची टीम अजून जास्त मजबूत केली आहे, त्यांनी काही अतिशय प्रभावी आंतरराष्ट्रीय आणि भारतीय खेळाडूंसोबत हातमिळवणी केली आहे, फिल सॉल्ट, मार्को जेन्सन, ट्रेव्हिस हेड, निकोलस पूरन, ट्रेन्ट बोल्ट आणि टी नटराजन यांचा त्यामध्ये समावेश आहे. हे खेळाडू ‘सर्कल में आजा’ कॅम्पेनमध्ये त्याला आकर्षक आणि प्रभावी बनवताना दिसतील.
“आजा मेरी गाडी में बैठ जा” या ९०च्या दशकातील अनु मलिक यांनी गायलेल्या अतिशय लोकप्रिय गाण्याची मजा या कॅम्पेनमध्ये नव्या रूपात अनुभवता येईल. या कॅम्पेनसाठी अनु मलिक यांनी “आजा मेरे सर्कल में आजा” हे नवे रूप तयार केले आहे, गतकाळाची आठवण आणि पटकन गाता येईल, लक्षात राहील असा साउंडट्रॅक संपूर्ण फिल्ममध्ये प्रेक्षकांसोबत राहतो.
३६० डिग्री मार्केटिंग कॅम्पेन ‘सर्कल में आजा’ टेलिव्हिजन, ओटीटी आणि सोशल मीडिया चॅनेल्सवर सुरु केले जाईल, सौरभ शुक्ला, रणविजय सिंघा, अभिषेक बनर्जी, दुर्गेश कुमार यासारख्या ख्यातनाम सेलिब्रेटीजसोबत सहयोग करून या कॅम्पेनचा प्रभाव आणि पोहोच वाढवली जाईल.
कॅम्पेन लिंक्स:
YouTube: https://youtu.be/1MxD2eBLBvk
· Instagram: https://www.instagram.com/reel/DHGW3Eeo3Es/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA%3D%3D
· X (formerly Twitter): https://x.com/My11Circle/status/1899797
416334991735


