Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणेच्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्सने भारतीय नौदलाकडून प्रतिष्ठित ऑर्डर जिंकली

पुणेच्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्सने भारतीय नौदलाकडून प्रतिष्ठित ऑर्डर जिंकली

पुणे, २ एप्रिल २०२५: भारतीय नौदल आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (KOEL) यांनी ‘मेक – I’ ( Make – I ) अंतर्गत एक महत्त्वपूर्ण प्रकल्प मान्यता आदेशावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या प्रकल्पाच्या अंतर्गत ६-मेगावॅट (6-MW) क्षमतेचा मध्यम गतीचा समुद्री डिझेल इंजिन डिझाइन आणि विकसित केला जाणार आहे.

 

 

 

KOEL कडून या प्रसंगी श्री. विनोद मेनन (हेड, इंडस्ट्रियल बिझनेस), श्री. सचिन केजरीवाल (मुख्य वित्तीय अधिकारी), श्री. संजय मुजुमदार (हेड, मरीन आणि डिफेन्स बिझनेस), आणि श्री. नजीब रहमान (मरीन सेगमेंट लीडर) यांनी सहभाग घेतला.

 

 

 

या प्रकल्पाच्या अंतर्गत विकसित होणाऱ्या प्रोटोटाईप डिझेल इंजिनमध्ये ५०% पेक्षा जास्त स्थानिक घटकांचा वापर केला जाईल. या प्रकल्पासाठी २७०कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, ज्यातील ७०% निधी भारत सरकारकडून पुरवली जाईल.

 

 

 

या ऑर्डर अनुसार किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनी ३ मेगावॅटपासून, ते १० मेगावॅटपर्यंत, क्षमतेची मध्यम गतीची इंजिने इन-हाऊस डिझाइन आणि विकसित करणार. ही इंजिने भारतीय नौदल आणि भारतीय कोस्ट गार्डच्या जहाजांवरील मुख्य प्रपल्शन आणि पॉवर जनरेशनसाठी वापरली जातील. सध्या, या प्रकारची बहुतेक इंजिने परदेशातून आयात केली जातात, त्यामुळे हा प्रकल्प भारत सरकारच्या स्थानिक उत्पादन आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतो.

 

 

 

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा भाग असल्याचा अभिमान बाळगते. या ऑर्डरमुळे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी कंपनीच्या वचनबद्धतेची पुष्टी होते. या प्रकल्पाचे डिझाइन आणि विकास KOEL च्या R&D टीमद्वारे पूर्णपणे देशांतर्गत पातळीवर केले जाईल, ज्याचाने संस्थेच्या अभियांत्रिकी आणि संशोधन व विकास (R&D) क्षमतांची जाणीव होते.

 

 

 

किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. गौरी किर्लोस्कर, यांनी म्हटले, “भारतीय नौदलाने या प्रतिष्ठित प्रकल्पासाठी आम्हाला निवडल्याचा आम्हाला अभिमान आहे! हा क्षण आमच्यासाठी अत्यंत गौरवाचा आहे. आमच्या तांत्रिक (technical) आणि संशोधन व विकास (R&D) क्षमतांच्या बळावर आम्ही भारतीय नौदलासाठी आणखी एक जागतिक दर्जाचा उत्पादन पुरवू – याची आम्हाला खात्री आहे. या प्रकल्पासाठी आम्हाला दिलेल्या समर्थन व मार्गदर्शनाबद्दल संरक्षण मंत्रालय, आणि, भारतीय नौदलाचे

मनःपूर्वक आभार!”

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments