इंटिरिअर सोल्युशन्स मध्ये जागतिक पातळीवर आघाडीची कंपनी असलेल्या हॅफलेने पुण्यात हॅफले डिझाईन स्टुडिओ गोल्ड – स्टुडिओ दे इंटेरिओ सुरु केला असून पश्चिम भारतात आपला विस्तार सुरु ठेवला आहे. वाकड येथील भूमकर चौक जवळ की स्टोन अलटूरा येथील ए विंग मध्ये असलेले हे नवीन प्रिमिअम दालन हॅफलेच्या किचन फिटींग्स, फर्निचर फिटींग्स, अप्लायन्सेस, लायटिंग सोल्युशन्स, सरफेसेस आणि वॉटर सोल्युशन्सच्या व्यापक श्रेणीचा अनुभव ग्राहकांना मिळेल.
या दालनाचे उद्घाटन हॅफले इंडियाचे व्यवसाय प्रमुख अविनाश पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटन प्रसंगी हॅफलेचे विविध प्रकारातील अद्ययावत सोल्युशन्स प्रदर्शित केले गेले. याशिवाय थेट प्रात्यक्षिके आणि उत्पादने प्रदर्शित केल्यामुळे ब्रँडची कार्यक्षमता, गुणवत्ता आणि डिझाईन मधील नावीन्यपूर्णता ग्राहकांना अनुभवता आली.
पुण्यातील रियल इस्टेट बाजारपेठ झपाट्याने वाढत असताना, उच्च दर्जाच्या, कार्यात्मक आणि सौंदर्यदृष्ट्या आकर्षक इंटिरिअर सोल्युशन्सची मागणी वाढत आहे. नवीन दालनामध्ये उच्च कार्यक्षमता असलेल्या कॉउंटरटॉप्स, बिल्ट-इन अप्लायन्सेस, वॉर्डरॉब्स, स्लायडिंग सिस्टिम्स, फर्निचर फिटिंग्स, शॉवर क्युबिकल्स यांसह किचनसाठी समर्पित झोन्स द्वारे ग्राहकांना प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळेल.
या नव्या दालनाबाबत बोलताना हॅफले इंडियाचे व्यवसाय प्रमुख अविनाश पांडे म्हणाले की, पुणे ही हॅफलेसाठी एक महत्वाची बाजारपेठ आहे. या नव्या स्टुडिओद्वारे ग्राहकांच्या बदलत्या गरजांनूसार उच्च दर्जाचे नाविन्यपूर्ण इंटिरिअर सोल्युशन्स देण्यावर आमचा भर आहे. प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेले हे स्टुडिओ आमच्या ग्राहकांना आमच्या जागतिक दर्जाच्या उत्पादनाचा अनुभव प्रदान करते.
या नवीन दालनासह हॅफले पुण्यातील आपली उपस्थिती आणखी मजबूत करत असून ग्राहकांना आलिशान, कार्यक्षम उत्पादने आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन असा अद्वितीय मिलाफ असलेली सेवा प्रदान करत आहे. हॅफले डिझाईन स्टुडिओ गोल्ड – स्टुडिओ दे इंटेरिओ हे अद्ययावत इंटिरिअर सोल्युशन्स मिळवू पाहणाऱ्या लोकांसाठी एक आकर्षक ठिकाण ठरेल.


