Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्रीरामराज्याभिषेक सोहळा तुळशीबाग श्रीराम मंदिरात उत्साहात साजरा*  श्री रामजी संस्थान तुळशीबाग...

श्रीरामराज्याभिषेक सोहळा तुळशीबाग श्रीराम मंदिरात उत्साहात साजरा*  श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे आयोजन ; श्रीरामनवमी उत्सवाचे यंदा २६४ वे वर्ष

 

पुणे : रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम… श्रीराम जय राम जय जय राम च्या अखंड गजरात प्रभू श्रीरामांच्या गाभा-यातील मूर्तीपासून पाऊले उमटलेली शुभ्रवस्त्रे तुळशीबाग श्रीराम मंदिराच्या सभामंडपात आली. पुणेकरांनी त्यावर फुलांची उधळण करीत श्रीरामराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला. संपूर्ण भारतात पायघड्यांचा हा सोहळा पुण्यातील तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात साजरा होतो.

 

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात लळीत पायघडीचे कीर्तन व श्रीराम राज्याभिषेकाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामध्ये यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष साजरे होत आहे.

 

लळीत पायघडीचे कीर्तन सुरु असताना राज्याभिषेक सोहळा अनुभविण्यासोबतच रत्नजडित सिंहासन वरी शोभे रघुनंदन… ही पदे देखील तुळशीबागवाले कुटुंबियांकडून म्हणण्यात आली. कुटुंबातील सदस्य व संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले यांच्या हस्ते श्रीराम राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उत्सवकाळातील मानक-यांचा सन्मान देखील करण्यात आला. कीर्तनकार ह.भ.प. दर्शन बुवा वझे यांचे कीर्तनही झाले.

 

भरत तुळशीबागवाले म्हणाले, श्रीरामजन्माननंतर पायघड्यांचा हा सोहळा फक्त तुळशीबागेतील राम मंदिरात साजरा केला जातो. नविन पांढºया शुभ्र वस्त्रावर श्रीरामांच्या पावलांचे ठसे उमटविले जातात आणि हे वस्त्र गाभाºयापासून सभामंडपापर्यंत आणले जाते. यावेळी लळीत पायघड्यांचे कीर्तन करण्यात येते. त्यानंतर श्रीरामांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होतो. सोहळ््यानंतर उत्सवकाळातील मानकºयांचा पुष्पहार व श्रीफळ देवून सन्मान करण्यात येतो, असे ही त्यांनी सांगितले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments