Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedआचार्य अत्रे रंगमंदिर येथे तृतीयपंथीयांसाठी महापालिकेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन....- आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीदिनानिमित्त...

आचार्य अत्रे रंगमंदिर येथे तृतीयपंथीयांसाठी महापालिकेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन….- आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीदिनानिमित्त तृतीयपंथीयांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा होणार गौरव.

पिंपरी ०८ एप्रिल २०२५- आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीदिनानिमित्त (९ एप्रिल) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील तृतीयपंथीयांसाठी पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी समाजातील तृतीयपंथीयांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या तृतीयपंथी व तृतीयपंथी संस्था यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच तृतीयपंथीयांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यामध्ये मराठी गीतांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी १ वाजता होणार असून कार्यक्रमास सहकार आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणार आहे. याव्यतिरिक्त खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, शंकर मांडेकर आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अँड. गोरक्ष लोखंडे यांची सन्माननीय उपस्थिती यावेळी असणार आहे. या मान्यवरांसह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी दिली आहे.

 

महापालिका तृतीयपंथीयांसाठी राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती घेण्यासाठी व विशेष कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील तृतीयपंथीयांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments