Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedरोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टिन, इंटीग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट ॲन्ड रिसर्च सेंटर (आयसीटीआरसी)...

रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टिन, इंटीग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट ॲन्ड रिसर्च सेंटर (आयसीटीआरसी) आणि ऑन्को-लाईफ कॅन्सर केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोली येथे अद्ययावत रेडिएशन व सिटी स्कॅन सेंटर

पुणे,14 एप्रिल 2025 : रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टिन, इंटीग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट ॲन्ड रिसर्च सेंटर (आयसीटीआरसी), आणि ऑन्को-लाईफ कॅन्सर केअर सेंटर ह्यांनी एकत्र येऊन वाघोली येथे अद्ययावत रेडिएशन व सिटी स्कॅन सेंटर स्थापित केले आहे. याचे उद्घाटन नुकतेच एका विशेष कार्यक्रमाने झाले. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ.भरत पंड्या उपस्थित होते. याबरोबरच रोटरी गव्हर्नर शीतल शहा,रोटेरियन डॉ.शैलेश पालेकर,आयसीटीआरसीचे विश्वस्त व वरिष्ठ रेडिएशन आँकोलॉजिस्ट डॉ.अरविंद कुलकर्णी, ऑन्को-लाईफ कॅन्सर केअर सेंटरचे अध्यक्ष उदय देशमुख,रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टिनच्या अध्यक्ष शिल्पा भोसकर आणि या प्रकल्पाचे समन्वयक रोटेरियन सुदिन आपटे हे मान्यवर उपस्थित होते.

 

स्थापित झालेले मशिन हे अद्ययावत उपकरण असून लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्व वयोगटातील रूग्णांना याचा लाभ होऊ शकतो. हे नवीन केंद्र कर्करोग रूग्णांसाठी अत्यंत उपयुक्त असून निदान व रेडिएशन उपचारांसाठी त्यांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही.

 

पूर्ण क्षमतेमध्ये हे केंद्र दरवर्षी 1200 कर्करोग रूग्णांना सेवा देऊ शकते. आयुष्मान भारत,महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना (एमजेपीजेएवाय) या योजनेअंतर्गत पात्र रूग्णांना रेडिएशन सेवा मोफत मिळू शकेल.

 

या प्रकल्पाचे समन्वयक रोटेरियन सुदीन आपटे म्हणाले की, हे आमचे दुसरे रेडिएशन केंद्र असून त्यातील पहिले सुर्या सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे आणि दरवर्षी 750 गरजू रूग्णांना याचा लाभ होत आहे. या नवीन केंद्राद्वारे दरवर्षी 1200 कर्करोग रूग्णांना मोफत सेवा मिळू शकेल.या सेवांचे मूल्य साधारण 21 कोटी रूपये आहे. याशिवाय सहयोग असलेल्या इतर हॉस्पिटल्समधील रूग्णांसाठी हे केंद्र ने-आण करण्याची व्यवस्था पुरविण्याचा प्रयत्न करेल आणि उपचारादरम्यान रूग्ण व एका नातेवाईकाला मोफत भोजन दिले जाईल. याशिवाय रेडिएशन थेरपीमुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी दिले जाणाऱ्या औषधांचे कीट याअंतर्गत देण्याचा आम्ही विचार करत आहोत.

 

ऑन्को-लाईफ कॅन्सर केअर सेंटरचे अध्यक्ष उदय देशमुख म्हणाले की, या केंद्राचा लाभ पूर्णपणे विविध योजना अंतर्गत पात्र असलेल्या रूग्णांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे.तरी येथे येणाऱ्यांपैकी किमान 80 टक्के रूग्ण हे गरजू असतील याबाबत आमची वचनबध्दता आहे.

 

आयसीटीआरसीचे विश्वस्त व वरिष्ठ रेडिएशन आँकोलॉजिस्ट डॉ.अरविंद कुलकर्णी म्हणाले की, 25 हून अधिक वर्षे रूग्णांना एकात्मिक पध्दतीने सेवा करण्याची हॉस्पिटलची परंपरा आहे. रूग्णांची इच्छा असल्यास आधुनिक तसेच आयुर्वेदिक उपचार प्रदान करण्यासाठी हॉस्पिटल सज्ज आहे.

 

रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टिनच्या अध्यक्ष शिल्पा भोसकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील क्लबच्या विविध उपक्रमांची मा

हिती दिली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments