ही विक्री १६ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान सुरू होईल आणि एअर कंडिशनर्स, कूलर्स आणि रेफ्रिजरेटर्सवर लाइव्ह होईल.
एलजी, व्होल्टास, डायकिन, गोदरेज आणि सॅमसंग यांच्यासारखे आघाडीचे ब्रँड्स ५५ टक्क्यांपर्यंत सवलत आणि विस्तारित ५ वर्षांची वॉरंटी देत आहेत.
ग्राहकांना सोप्या पेमेंट पर्याय उपलब्ध करून दिले जातील, जसे की नो-कॉस्ट ईएमआय, बँक ऑफर्स, सुपरकॉइन ऑफर्स आणि ₹८,०००/- पर्यंतचे एक्सचेंज फायदे.
खरेदीचा अनुभव अधिक सुलभ आणि आनंददायी बनवण्यासाठी ग्राहकांना मागणीनुसार व्हिडिओ सहाय्य दिले जाईल.
बंगळुरू, १५ एप्रिल २०२५: देश उन्हाळ्यासाठी सज्ज असताना भारतातील घरगुती ई-कॉमर्स मार्केटप्लेस, फ्लिपकार्ट, सुपर कूलिंग डेजच्या ७ व्या आवृत्तीसह परतला आहे, हा एक वार्षिक सेल असून त्यातून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत विविध प्रकारच्या कूलिंग उपकरणे मिळतील. १६ एप्रिल ते २४ एप्रिल २०२५ दरम्यान नियोजित हे प्रमुख उपकरण ब्रँड, रोमांचक डील आणि एक अखंड खरेदी अनुभव एकत्र आणते. त्यामुळे ग्राहकांना या हंगामात त्यांची आवश्यक कूलिंग उपकरणे अपग्रेड करण्याची ही एक उत्तम संधी आहे.
भारतातील कूलिंग उपकरणांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या विविध गरजा आणि बजेट पूर्ण करण्यासाठी फ्लिपकार्ट सुपर कूलिंग डेजचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात गुणवत्ता, निवड आणि मूल्य हे सर्व मिळेल. सेलदरम्यान ग्राहक नो-कॉस्ट ईएमआय, आघाडीच्या बँकांकडून पूर्व-मंजूर ऑफर आणि सुपरकॉइन रिडेम्पशन यासारख्या विविध परवडणाऱ्या वित्तपुरवठा पर्यायांमधून निवड करू शकतात. याव्यतिरिक्त ग्राहक एक्सचेंज प्रोग्रामचा लाभ घेऊ शकतात. त्यात निवडक खरेदीवर ८०००/- रूपयांपर्यंत फायदे देतो. त्यामुळे या हंगामात उपकरणे अपग्रेड करणे अधिक फायदेशीर ठरते. फ्लिपकार्टची सेवा शाखा जीवेस प्रशिक्षित तंत्रज्ञांद्वारे केलेल्या इन्स्टॉलेशनसह सोयीस्कर, विश्वासार्ह आणि किफायतशीर विक्री-पश्चात सेवा प्रदान करून खरेदीपासून वापरापर्यंत सहजसुलभ अनुभव देईल.
एअरकंडिशनर्स: ग्राहकांना व्होल्टास, एलजी आणि ब्लू स्टार सारख्या आघाडीच्या ब्रँड्सच्या टॉप-रेटेड मॉडेल्सवर ५५% पर्यंत सूट मिळण्याची शक्यता आहे. फक्त ₹२६,४९०/- पासून सुरू होणारे हे एसी इन्व्हर्टर तंत्रज्ञान, ऊर्जा कार्यक्षमता, स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि अँटी-बॅक्टेरियल फिल्टर्स यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहेत, ज्यामुळे ते बजेटबाबत जागरूक ग्राहक आणि वाढीव कामगिरी आणि आरामदायीपणाबाबत जागरूक प्रीमियम ग्राहकांसाठी आदर्श बनतात. काही उत्तम डील्समध्ये व्होल्टास १.५ टन ३ स्टार एसी ₹३०,४९०/-, पॅनासोनिक १.५ टन ३ स्टार एसी ₹३३,९९०/- आणि एलजी १.५ टन ३ स्टार एसी ₹३४,६९०/- यांचा समावेश आहे.
एअर कूलर्स: फ्लिपकार्टवर बजाज, केनस्टार आणि हिंदवेअर सारख्या टॉप ब्रँड्सच्या पर्सनल, डेझर्ट आणि टॉवर मॉडेल्ससह एअर कूलरची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. पर्सनल कूलरसाठी ₹३,९९९/- आणि डेझर्ट कूलरसाठी ₹४,९९९/- पासून सुरू होणाऱ्या किमतींसह ते कोरड्या, उष्ण प्रदेशांसाठी आणि कार्यक्षम होम कूलिंग हवे असलेल्या मूल्य-जागरूक खरेदीदारांसाठी आदर्श आहेत. टॉप पर्सनल कूलर डील्समध्ये केनस्टार ४५एल ₹४,९९९/-, क्रॉम्प्टन ४५एल ₹५,४९९/-, व्होल्टास ३६एल ₹५,४९९/- आणि सॅन्सुई ३७एल ₹४,४९९/- आहेत. जास्त पॉवरची आवश्यकता असलेल्यांसाठी नियमित डेझर्ट कूलर डीलमध्ये केनस्टार ९०एल ₹७,९९९/-, क्रॉम्प्टन ७५एल ₹९,२९९/-, बजाज ९०एल ₹१०,९९९/- आणि हिंदवेअर ८५एल ₹८,४९९/- उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टने विशेषतः टियर 2 शहरांमध्ये उच्च क्षमतेच्या डेझर्ट कूलरची वाढती मागणीदेखील लक्षात घेऊन फ्लिपकार्टचे लॉजिस्टिक्स आणि विक्रेत्यांची साखळी पोहोच आणि जलद सेवा देत आहे.
रेफ्रिजरेटर्स: रेफ्रिजरेटर्स वर्षभर आवश्यक असतात आणि सुपर कूलिंग डेज दरम्यान ग्राहक आपल्या स्वयंपाकघरांना नवीन मॉडेल्ससह उत्तम किमतीत सुधारू शकतात. इथे ब्रँड ६०% पर्यंत सूट देतात. कॉम्पॅक्ट सिंगल-डोअर फ्रिजपासून ते प्रशस्त डबल-डोअर आणि साइड-बाय-साइड पर्यायांपर्यंत, फ्लिपकार्टचा संग्रह घरगुती गरजांच्या विस्तृत श्रेणीची पूर्तता करतो. त्याच्या किमती ₹९,९९०/- ते ₹१,०७,९९०/- पर्यंत आहेत. इन्व्हर्टर कॉम्प्रेसर, कन्व्हर्टिबल स्टोरेज आणि जलद कूलिंग वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेल्या रेफ्रिजरेटर्समध्ये ₹३६,७४०/- मध्ये सॅमसंग ३५०L ३-स्टार मॉडेल, ₹२३,७४०/- मध्ये व्हर्लपूल २३५L ट्रिपल डोअर आणि ₹५२,७४०/- मध्ये हायर ५९६L साइड-बाय-साइड यांचा समावेश आहे.
उत्तम आणि विश्वासार्ह खरेदी अनुभवासाठी सॅमसंग, व्हर्लपूल आणि हायर सारखे आघाडीचे ब्रँड ५ वर्षांच्या विस्तारित वॉरंटी देत आहेत. त्यामुळे उत्पादनाच्या गुणवत्तेवर आणि विक्रीनंतरच्या समर्थनावर ग्राहकांचा विश्वास वाढतो. खरेदीचा अनुभव अधिक सुखद आणि आनंददायी बनवण्यासाठी फ्लिपकार्ट मागणीवरून व्हिडिओ असिस्टन्स वैशिष्ट्य ऑफर करेल. त्यात तज्ञ एजंट त्यांना त्यांच्या खरेदी प्रवासात मार्गदर्शन करतील.


