पुणे, दि. 15 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह चांडोली ता. खेड व अनु.जाती व नवबौद्ध मुलींची निवासी शाळा चांडोली आणि बी.सी.व ई.बी.सी मुलींचे शासकीय वसतिगृह राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने वसतिगृहात सोमवारी (14 एप्रिल) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करणात आली.
या सप्ताहानिमित्त ॲड. निलेश आंधळे व नामदेव वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले.
या जयंतीच्या निमित्ताने 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 पर्यंत सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात आला. समता सप्ताहाच्या कालावधीत भीम जागर गीते, संविधान जागृती लोकनृत्य, वक्तृत्व, निबंध, पोस्टर, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करुन व सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन सामाजिक समता सप्ताहाची सांगता करण्यात आली, असे वसतिगृहाच्या गृहपालांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
00000