पुणे, दि. 15 : पीडित महिला, तक्रारदार महिलांना आपल्या लेखी समस्या मांडता याव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरासाठी आता ऑटो क्लस्टर, प्लॉट नं. सी 181, एमआयडीसी, चिंचवड या ठिकाणी 17 एप्रिल रोजी जनसुनावणी होणार आहे. या बदलाची नोंद घेऊन सुनावणीकरिता पीडित महिला, तक्रारदार महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा बिरारीस यांनी केले आहे.
0000
0


