Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedहोंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाची नवीन 2025 Dio 125 बाजारात दाखल

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाची नवीन 2025 Dio 125 बाजारात दाखल

 

पुणे,16 एप्रिल 2025: ग्राहक-केंद्री उत्पादनांची आपली परंपरा कायम ठेवत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI)ने आज नवीन OBD2B compliant Dio 125 बाजारात दाखल केली. नजरेत भरणारे ठसठशीत सौंदर्य आणि प्रगत वैशिष्ट्ये यांनी परिपूर्ण नव्या 2025 होंडा Dio125 च्या किंमती रु. 96,749 (एक्स-शोरूम पुणे) पासून सुरू होत आहेत.

OBD2B compliant Dio 125 च्या अनावरणप्रसंगी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर, अध्यक्ष आणि सीईओ श्री. त्सुत्सुमु ओटानी म्हणाले, “गेल्या २१ वर्षांहून अधिक काळापासून Dio हे भारतीय बाजारपेठेतील एक आयकॉनिक नाव बनून राहिले आहे, जे शैली, कामगिरी आणि विश्वास यांचे प्रतीक म्हणून उभे आहे. नव्या प्रवाहांना साजेशा आणि विश्वासार्ह मोटो-स्कूटरच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी Dio ही सातत्याने पहिली पसंती असत आली आहे. आता नवी OBD2B Dio 125 बाजारात दाखल होत असताना आम्ही तिचा ऐतिहासिक वारसा पुढे घेऊन जाण्यास उत्सुक आहोत व हे करताना मोटो-स्कूटरची मूळ संकल्पना जशीच्या तशी ठेवत ग्राहकांसाठी त्यात अधिक मोलाची वैशिष्ट्ये व अधिक उत्साहपूर्णतेची भर टाकत आहोत.”

या घोषणेबाबत आपले मत व्यक्त करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या सेल्स अँड मार्केटिंग विभागाचे डिरेक्टर श्री. योगेश माथूर म्हणाले, “वर्षानुवर्षे युवा भारताच्या मनाला साद घालणा-या Dio 125 स्कूटरची OBD2B ही नवी आवृत्ती बाजारात दाखल करत असताना आमचे मन उल्हसित झाले आहे. नव्याने सजवलेले ग्राफिक्स, प्रगत TFT डिस्प्ले आणि सुधारित कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये असलेली नवीन Dio 125 आजच्या ग्राहकांच्या बदलत्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आली आहे. ‘Dio wanna Have Fun?’ या टॅगलाइनला जागणारी ही मोटा स्कूटर नेहमीच भारताच्या तरुण पिढीची लोकप्रिय पसंती राहिली आहे आणि या ताज्या सुधारणांमुळे या गटातील तिचे स्थान अधिकच भक्कम होणार आहे.”

नवीन Dio 125: प्रगत वैशिष्ट्ये आणि नवीन रंग

Dio 125 आता नजरेत भरणा-या नव्या अधिक ताज्या ग्राफिक्ससह आणि तिच्या फंकी, तारुण्यसुलभ आकर्षक रूपाला अधिक खुलवणा-या लक्षवेधी रंगसंगतीमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांना सवारीचा अधिक चांगला अनुभव देण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आलेली अनेक नवीन वैशिष्ट्ये तिचे सौंदर्य खुलवित आहेत. या नव्या आवृत्तीच्या केंद्रस्थानी आहे 123.92cc, सिंगल सिलेंडर PGM-Fi इंजिन हे आता OBD2B निकषांची पूर्तता करणारे आहे. ते 6.11 kW पॉवर तयार करते आणि 10.5Nm टॉर्क देते. ही मोटो-स्कूटर प्रगत आयलिंग स्टॉप सिस्टीमने सुसज्ज आहे, जी इंधनाची अधिक बचत करते व ती होंडाच्या शाश्वततेच्या तत्त्वाशी मेळ साधणारी आहे.

वैशिष्ट्यांच्या बाबतीत सांगायचे तर Dio 125 ला नवीन 4.2 इंची TFT डिस्प्ले लाभला आहे, ज्यात मायलेज इंडिकेटर्स, ट्रिप मीटर, इको इंडिकेटर आणि रेंज (डिस्टन्स टू एम्प्टी) दर्शविली जाते. हे होंडा Roadsync अॅपला जोडता येते, ज्याद्वारे दिशादर्शन आणि कॉल/मेसेज अलर्टस् सारखी वैशिष्ट्ये वापरता येतात, व रायडर्सना प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर कनेक्टेड राहता येते. Dio 125 स्मार्ट की आणि USB टाइप-सी चार्जिंग पोर्टनेही सुसज्ज आहे, ज्यामुळे रायडर्सना रस्त्यावर असतानाही आपल्या डिव्हाइस चार्ज करता येते.

Dio ब्रॅण्डवर ग्राहकांनी वर्षानुवर्ष पुन:पुन्हा दाखविलेल्या विश्वासाला जागत Dio 125 ने आपली आयकॉनिक बाह्यरेखा तशीच ठेवली आहे व तिच्या दर्शनी रूपात भर टाकली आहे. हे वाहन DLX आणि H-Smart या दोन प्रकारांमध्ये व रंगांच्या पाच पर्यायांसह उपलब्ध आहे. हे रंग आहेत – मॅट मार्व्हल ब्लू, मेटॅलिक, पर्ल डीप ग्राउंड ग्रे, पर्ल स्पोर्टस् यलो, पर्ल इग्नियस ब्लॅक आणि इम्पीरियल रेड

नवीन Dio 125: किंमत आणि उपलब्धता

नवीन 2025 Honda Dio 125 च्या किंमती एक्स-शोरूम पुणेनुसार रु. 96,749 पासून सुरू होतात व ती आता HMSI च्या भारतभरातील डीलरशीप्समध्ये उपलब्ध आहे.

मॉडेल प्रकार किंमत (एक्स-शोरूम पुणे)

Dio 125 DLX Rs. 96,749

H-Smart Rs. 1,02,144

 

================================================

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments