Sunday, November 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedसुखी, सुशिक्षित, सन्मानित स्त्री म्हणजेच प्रगत देश* *अमृता फडणवीस : प्रभात...

सुखी, सुशिक्षित, सन्मानित स्त्री म्हणजेच प्रगत देश* *अमृता फडणवीस : प्रभात जन प्रतिष्ठान आणि प्रभात मित्र मंडळातर्फे आपुलकीची भाऊबीज आणि शौर्य पुरस्कार*

 

 

पुणे : आपल्या आजूबाजूला केवळ इमारती आणि इतर पायाभूत सोयी-सुविधा असणे म्हणजे प्रगती नाही. तर सुखी, सुशिक्षित, सन्मानित स्त्री समाजात असणे म्हणजे तो देश खऱ्या अर्थाने प्रगत देश आहे. जेव्हा आपण सगळ्यांना घेऊन सोबत चालतो तेव्हा आपली आणि देशाची प्रगती होते, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.

 

गुरुवार पेठेतील प्रभात जन प्रतिष्ठान आणि प्रभात मित्र मंडळातर्फे आपुलकीची भाऊबीज आणि शौर्य पुरस्कार २०२६ वितरण सोहळ्याचे आयोजन महात्मा फुले पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे करण्यात आले. यावेळी भागवताचार्य ह.भ.प. प्रियांका भोसले, उद्योजक कृष्णकुमार गोयल, प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर चव्हाण,स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, नगरसेवक ऐश्वर्या थोरात, स्नेहा माळवदे, सम्राट थोरात, पेशवाई क्रिएशनचे राहुल येमूल, सचिव उदय वाडेकर, उत्सव प्रमुख नितीन घोगरे, अमोल व्यवहारे, मंगेश शिंदे , अमोल थोरात, हेमराज साळुंके आदी उपस्थित होते.

 

हुतात्मा जवान घनश्याम आढाळगे यांच्या कुटुंबियांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचे वडील रायबा आणि आई सुनंदा आढाळगे यांनी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी पूर्व भागातील दोनशेहून अधिक महिलांना दिवाळी साहित्य संच भाऊबीज ओवाळणी स्वरूपात देण्यात आला.

 

अमृता फडणवीस म्हणाल्या, वसुदैव कुटुंबकम हा सुंदर विचार आहे. संपूर्ण भारत देश म्हणजे आपले घर हा विचार महत्त्वाचा आहे. आपल्या कुटुंबाप्रमाणेच आपल्या आजूबाजूचे लोक सुखात आणि सुरक्षित आहेत का? हे देखील आपण पाहणे जरुरीचे आहे. ते काम आज ‘आपुलकीची भाऊबीज’ या उपक्रमातून होताना दिसत आहे.

 

प्रियांका भोसले म्हणाल्या, आपली संस्कृती आपण विसरत चाललो आहोत. गीता, ज्ञानेश्वरी, रामायण हे आजच्या पिढीपर्यंत पोहोचलेले नाही. ज्या देशात संस्कृती नाही, तो देश किती टिकेल हे सांगता येत नाही. भारत देश हा संस्कृती प्रधान देश असून धर्माचे शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे.

 

कृष्णकुमार गोयल म्हणाले, भाऊबीज म्हणजे बहिणीने भावाला औक्षण करणे इतकेच नाही. तर एकमेकांसाठी खंबीरपणे उभे राहण्याची भावना आहे. आपण बहिणीमागे उभे राहतो, तसे देशाच्या सैनिकांच्या कुटुंबामागे आणि मातोश्रीच्या मागे उभे राहणे, हे काम मंडळाने केले आहे. हा सन्मान फक्त त्या सैनिकाचा नाही तर भारतमातेप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचा, त्यागाचा सन्मान आहे. समाजात माणुसकी जिवंत आहे म्हणून आपुलकी जागृत आहे.

 

किशोर चव्हाण, शहराच्या पूर्व भागात हिंदू समाज हा एकत्रपणे गुण्यागोविंदाने राहतो. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या या पूर्व भागात सर्वांच्या घरी दिवाळी व्हावी,यासाठी मंडळाने १५ वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरु केला. त्यामुळे दिवाळी किट मधून २७ प्रकारचे साहित्य व साडी दिली जाते. मदत नव्हे भाऊबीजेची भेट दिली जाते. सामाजिक आणि आपुलकीची दिवाळी केली जाते. त्याचबरोबर देशाची सुरक्षा करणारे वीर जवान आणि हुतात्मा जवान यांनाही आज स्मरण करून त्यांच्या शौर्याचा सन्मान केला जातो, असेही त्यांनी सांगितले. रवींद्र भन्साळी यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments