Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedइलेक्ट्रिक स्कूटर कंपनी 'रिव्हर'ने पुणे येथे केले महाराष्ट्रातील पहिल्या स्टोरचे उदघाट्न

इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी ‘रिव्हर’ने पुणे येथे केले महाराष्ट्रातील पहिल्या स्टोरचे उदघाट्न

खराडीमधील रिलायन्स मॉलजवळ असलेलं हे स्टोर इंडी इलेक्ट्रिक स्कूटर, ॲक्सेसरीज़ आणि मर्चेंडाईज विक्री करणार आहे.

पुणे, 30 एप्रिल 2025: इलेक्ट्रिक स्कूटर मॅनुफॅक्चरर कंपनी रिव्हरने महाराष्ट्रातील आपल्या पहिल्या स्टोरचे पुणे येथे उदघाटन केले आहे. हे स्टोर ब्रँडचा स्ट्रॉंगहोल्ड असलेल्या दक्षिण भारताबाहेरील त्यांचा पहिला उपक्रम आहे. 1300 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेलं खराडी येथील रिव्हर स्टोर हे रलास व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने सुरू करण्यात आलं आहे. रिव्हर स्टोरमध्ये ग्राहकांना इंडी, रिव्हरच्या सर्व ॲक्सेसरीज़ आणि मर्चेंडाईज अर्थात ब्रँडेड वस्तू यांचं प्रत्यक्ष प्रदर्शन पाहायला मिळेल. याशिवाय, या स्टोअरमध्ये एक पूर्ण संचालित सर्व्हिस सेंटर सुद्धा आहे, ज्याचं क्षेत्रफळ 4000 स्क्वेअर फूट असून स्टोरच्या 4 किमीच्या रेडियसच्या परिसरातच आहे.

स्टोरच्या उदघाटनप्रसंगी बोलताना रिव्हरचे को-फाउंडर आणि चीफ एक्सिक्युटीव्ह ऑफिसर अरविंद मनि म्हणाले, “पुणे हे बऱ्याच काळापासून ऑटोमोटिव्ह एक्सलेंसचे हब राहिले आहे. जेव्हा आम्ही इंडी लॉन्च केली, तेव्हा आम्हाला या शहरातून खूप प्री-ऑर्डर्स मिळाल्या आणि आता आम्ही स्कूटर्समधील स्पोर्ट युटिलिटी वेहिकल (एसयूव्ही) पुण्यात घेऊन येताना खूप उत्साही आहोत. रिव्हर इंडीला या भागात एक खास वेगळे वेहिकल म्हणून प्रस्थापित करणे आमचं उद्दिष्ट आहे, जे स्टाईल आणि कन्विनियन्सला एकत्र आणतं. पुणे येथील स्टोर ही महाराष्ट्रातली आमची सुरुवात आहे आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आम्ही नाशिक, नागपूर, मुंबई आणि आणखी काही ठिकाणी स्टोअर्स उघडणार आहोत.”

पुण्यानंतर, रिव्हर पुढील सहा महिन्यांत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 10 नवीन स्टोअर्स सुरू करून आपली उपस्थिती वाढवण्याची योजना आखत आहे.. कंपनी दक्षिण भारतातही विजयवाडा, त्रिसूर, पॉंडिचेरी आणि पलक्कड अशा ठिकाणी नवीन स्टोअर्स सुरू करत व्यवसाय विस्तार करणार आहे. रिव्हर सध्या वेगाने विस्तार करण्याच्या टप्प्यात आहे आणि यावर्षी पश्चिम, पूर्व आणि उत्तर भारतातील मार्केटमध्ये आपली उपस्थिती मजबूत करण्याचं त्यांचं नियोजन आहे. सध्या, कंपनी बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, हुबळी, विशाखापट्टणम, कोची, कोयंबतूर, मैसूर, तिरुपती आणि इतर ठिकाणी 20 स्टोअर्स ऑपरेट करत आहे.

खराडीममधील रिव्हर स्टोरमध्ये ग्राहकांना व्हायब्रन्ट वातावरण अनुभवायला मिळणार आहे. ब्रँडची सौंदयदृष्टी दाखविण्यासाठी यात नदीच्या सारांशाची आठवण करून देणाऱ्या गोट्या आणि इतर सेंद्रिय आकारांचा समावेश करण्यात आला आहे ज्यातून इंडी कशी तुमच्या दैनंदिन जीवनात मिसळून जाते हे दाखविण्यात आले आहे. ही गोष्ट रिव्हरच्या तत्वज्ञानाशी जुळते- ‘Taking People From where They Are To where They Want To Be’

इंडीची किंमत 1,44,499 (एक्स -शोरूम, पुणे) आहे. ग्राहक स्टोरला भेट देऊन टेस्ट राईड्स घेऊ शकतात. यासह ग्राहकांना स्टोरमधून ब्रँडेड वस्तूंची खरेदी करता येणार असून, इंडी स्कूटर बुक देखील करता येईल. ग्राहकांना www.rideriver.com या संकेतस्थळावरून सुद्धा टेस्ट राईड्स बुकिंग आणि ऑनलाईन खरेदी करता येईल.
रिव्हर स्टोर, खराडीचा पत्ता शॉप नं. 2, गुडविल लँडमार्क अपार्टमेंट्स, सर्व्हे नं. 11, हिस्सा नं. 10, खराडी, पुणे, महाराष्ट्र – 411014 हा आहे.

रिव्हर बद्दल:
रिव्हर ही बेंगळुरूस्थित इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी आहे. डिझाईन आणि टेक्नॉलॉजीवर भर देत रिव्हर अशे प्रॉडक्ट्स बनवतात जे लोकांच्या दैनंदिन जीवनावर सकारात्मक परिणाम करतात. मार्च 2021 मध्ये अरविंद मणि आणि विपीन जॉर्ज यांनी ही कंपनी स्थापन केली. रिव्हरला जपान-स्थित यामाहा मोटर कॉर्पोरेशन, मितसुई अँड को.लिमिटेड, मारूबेनी कॉर्पोरेशन, दुबईस्थित अल फुतैम ग्रुप, क्रिस सॅका’ज लोवरकार्बन कॅपिटल, टोयोटा व्हेंचर्स, मणि व मोबिलिटी आणि ट्रक्स व्हीसी सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांचा पाठिंबा आहे.

Website:https://www.rideriver.com/
LinkedIn:@rideriver
Instagram:@rideriver.in
YouTube:@rideriver
X: @worldofriver

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments