पुणे : लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२ च्या ७व्या वार्षिक अधिवेशनात लायन रविंद्र गोलर यांना लायन प्रेसिडेन्शियल अॅवॉर्ड प्रदान करून गौरविण्यात आले. सध्या कॅबिनेट सचिव पदावर कार्यरत असलेल्या गोलर यांना वर्षभर विविध सामाजिक कार्यात केलेल्या सक्रिय सहभागाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
लायन्स क्लबचा सर्वोच्च मानला जाणारा हा प्रेसिडेन्शियल मेडल प्रांतपाल विजय सारडा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज मुछाल आणि मान्यवर उपस्थित होते.
रविंद्र गोलर म्हणाले, लायन्स क्लबच्या माध्यमातून समाजातील विविध गरजू घटकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांची सेवा करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. या पुरस्काराने पुढील सेवाकार्यासाठी नवी ऊर्जा मिळाली आहे. समाजाप्रती असलेली जबाबदारी अधिक वाढली आहे आणि ती प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. लायन्स क्लबने दिलेल्या संधीमुळे अनेक उपक्रम राबविता आले आणि लोकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवता आला. भविष्यातही अधिक व्यापक पातळीवर काम करण्याचा प्रयत्न राहील.


