मुंबई, भारत- मे 02 2025: मे महिन्याचा आनंद लुटण्यासाठी तयार व्हा! अॅमेझॉनची मोफत सेवा असलेले अॅमेझॉन एमएक्स प्लेयर आता WAVES 2025 (वर्ल्ड ऑडिओ आणि व्हिज्युअल समिट) चा जलवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज आहे. त्यात त्यांच्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या व्ही-देसी कॅटेलॉगमध्ये 20 पेक्षा जास्त जागतिक शीर्षके जोडण्याची घोषणाही करण्यात आली आहे. या यादीमध्ये बहुप्रतिक्षित कोरियन, मँडरिन आणि तुर्की ड्रामा तर आहेतच, पण त्याचबरोबर स्ट्रिमिंग सेवेसाठी पहिल्यांदाच अॅनिमे कॅटेगरीचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे कोरिअन, मँडरिन, तुर्की आणि आता जपानी भाषेतील 200 पेक्षा जास्त अॅनिमे शो असलेल्या लायब्ररीसह आंतरराष्ट्रीय मनोरंजन साहित्य डब केलेले सर्वात मोठे AVOD व्यासपीठ म्हणून अॅमेझॉन एमएक्स प्लेयरचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. ही लायब्ररी दर आठवड्याला वाढत आहे, जे हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये स्ट्रीम करण्यासाठी उपलब्ध आहे.
या नव्याने जाहीर करण्यात आलेल्या व्यासपीठात ‘फेक इट टिल यू मेक इट’ हा हाय क्लास कॉर्पोरेट रोमांटिक शो, ’वेंड्रेलाज डायरी’ या फिल-गुड स्टोरीटेलिंगपासून ते ‘ख्रिसॅलिस’ या तुर्की भाषेतील भावनिक ड्रामापर्यंत आणि ‘फिश नोज यू’ या फन फॅन्टसीपर्यंत विविध प्रकारच्या मनोरंजनाचे मिश्रण आहे. के- ड्रामाचे फॅन ‘गॉस इलेक्ट्रॉनिक्स आणि प्राईड अँड प्रेज्युडाईस यासारख्या हिट्सची वाट पाहू शकतात, ज्यामध्ये रोमान्स, कॉमेडी, थरार असे सगळे आहे. आपल्या कंटेट ऑफरिंगचा आणखी विस्तार करत, अॅमेझॉन एमएक्स प्लेअरने पहिल्यांदाच अॅनिमे सुरू केले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या स्पाय X फॅमिली, डेमॉन स्लेयर, वन पंच मॅन, जोजोज बिझारे अॅडव्हेंचर आणि बऱ्याच शोंचा समावेश आहे. हे सर्व शोज हिंदीमध्ये डब करण्यात आले आहेत आणि भारतीय प्रेक्षकांसाठी मोफत उपलब्ध आहेत.
‘वेव्हज (Waves-2025) 2025 मध्ये याचे जोरदार उद्घाटन करताना अॅमेझॉन एमएक्स प्लेअरचे संचालक आणि कंटेट प्रमुख अमोघ दुसाद म्हणाले की, “आम्ही आमच्या डब केलेल्या कंटेटचा विस्तार करतानाच, आमच्या नव्या अॅनिमे श्रेणीसह 20 पेक्षा जास्त नवे आंतरराष्ट्रीय शो तुमच्यासाठी आणताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे. आमच्या प्रेक्षकांना काहीतरी नवीन बघण्याच्या रोमहर्षक पाहायला मिळण्याच्या दृष्टीने टाकण्यात आलेले हे महत्वाचे पाऊल आहे. आम्ही विशेष म्हणजेच प्रिमियम स्थानिक कंटेट मोफत देण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत, ज्यामुळे भारतातील जास्तीत जास्त प्रेक्षकांना जागतिक दर्जाचे मनोरंजन सहज उपलब्ध होईल आणि ते दर आठवड्याला त्याचा आनंद घेऊ शकतील.”
कोरियन ड्रामाज, मँडरिन सीरीज, तुर्कीश ड्रामा आणि अॅनिमे यांच्यासह नवीन जागतिक दर्जाच्या शोंची नवीन यादी फक्त आणि फक्त अॅमेझॉन एमएक्स प्लेअरवरच मोफत सादर केली जाईल. ही यादी मोबाईलवरील अॅप्स, अॅमेझॉन शॉपिंग अॅप, प्राईम व्हिडिओ, फायर टीव्ही, एअरटेल एक्स्ट्रिम आणि त्यांच्याशी जोडलेले टीव्ही यावर उपलब्ध असेल.
XXX


