Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorized*चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका* *आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

*चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका* *आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

पुणे, दि.६: चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या ‘एलजे’ या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांसाठी आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक विहित शुल्क भरुन हवा असेल त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) ७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० दरम्यान कार्यालयाच्या परिवहन विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करणे आवश्यक राहील.

चारचाकी वाहन क्रमांकाची यादी ८ फेब्रुवारी रोजी कार्यालयीन सूचनाफलकावर लावण्यात आल्यानंतर अर्जदारांनी लिलावासाठी जास्त रक्कमेचा एकच डीडी दुपारी २.३० वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात घालून जमा करावा. डीडी ‘डीवाय. आर.टी.ओ. पिंपरी-चिंचवड’या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता लिफाफे उघडून जास्तीत जास्त रकमेचा धनाकर्ष सादर केलेल्या अर्जदारास पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेले शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही. आकर्षक क्रमांकाचे शुल्क बदल झाल्यास त्यावेळी विहीत करण्यात आलेले शुल्क लागू राहील, असेही पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments