स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी स्वागत केले आहे.
पांडे म्हणाले, ” पराभवाच्या भीतीने महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात कचखाऊ भूमिका घेतली होती. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत वेळ गेला. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने निवडणुका घेण्यासंदर्भात आम्हाला कुठलीच अडचण नसल्याचे न्यायालयात स्पष्टपणे सांगितल्याने या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला.”
पांडे पुढे म्हणाले, “सप्टेंबर पूर्वी निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत.
पुढील ४ आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करायची आहे. 2022 पूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपला आहे, त्यांच्या निवडणुका जुन्या ओबीसी आरक्षणा नुसार घेण्यात येतील. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा तिढा सध्या सुटला आहे. राजकीय पक्ष म्हणून या निवडणुकीस सामोरे जाण्यास प्रदेश भाजपा तयारीत आहे. विधानसभेप्रमाणेच या निवडणुकातही आम्ही यश मिळवू असा विश्वास वाटतो.”


