Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedअर्बन कंपनी लिमिटेडने आयपीओमधून 1900 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्यासाठी सेबीकडे डीआरएचपी दाखल...

अर्बन कंपनी लिमिटेडने आयपीओमधून 1900 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्यासाठी सेबीकडे डीआरएचपी दाखल केले

अर्बन कंपनी लिमिटेड, घर आणि सौंदर्याशी संबंधित विविध विभागांमध्ये दर्जेदार सेवा आणि उपाययोजनांसाठी उच्च तंत्रज्ञानयुक्त, फुल-स्टॅक ऑनलाईन सेवा मार्केटप्लेस चालवणाऱ्या या कंपनीने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे आपले ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केले आहे. 19000 मिलियन रुपये म्हणजे 1900 कोटी रुपयांपर्यंत आयपीओमार्फत इक्विटी समभागांच्या (दर्शनी मूल्य प्रत्येक समभागासाठी 1 रुपया) ऑफरमार्फत फंड्स उभारण्याची कंपनीची योजना आहे.

या ऑफरमध्ये 4290 मिलियन रुपयांपर्यंतच्या (429 कोटी रुपये) नव्याने जारी केलेल्या इक्विटी समभागांचा (फ्रेश इश्यू) आणि 14710 मिलियन रुपयांपर्यंतच्या (1471 कोटी रुपये) समभाग विक्री करू इच्छिणाऱ्या समभागधारकांनी विक्रीसाठी प्रस्तुत केलेल्या समभागांचा (ऑफर फॉर सेल) समावेश आहे.

या कंपनीचे प्रमोटर अभिराज सिंग भाल (चेयरपर्सन, मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर), राघव चंद्रा (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चीफ टेक्नॉलॉजी अँड प्रॉडक्ट ऑफिसर) आणि वरुण खैतान (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) हे आहेत.

गुंतवणूकदारांमध्ये यांचा समावेश आहे – एक्सेल इंडिया IV (मॉरिशस) लिमिटेड, एलिव्हेशन कॅपिटल V लिमिटेड (आधीची सैफ पार्टनर्स इंडिया V लिमिटेड), व्हिवायसी11 लिमिटेड, बेसेमर इंडिया कॅपिटल होल्डिंग्स II लिमिटेड, नास्पर्स व्हेन्चर्स बी. व्ही., इंटरनेट फंड V पीटीई लिमिटेड, थिंक इन्व्हेस्टमेंट्स पीसीसी, आरोही सीड एसपीसी – आरोही सीड एसपी-1, वेलिंग्टन हॅडले हार्बर एआयव्ही मास्टर इन्व्हेस्टर्स (केमॅन) III, लिमिटेड, एबीजी कॅपिटल, डीएफ इंटरनॅशनल पार्टनर्स आणि इतर.

रेडसीर रिपोर्टनुसार, नेट ट्रान्जॅक्शन व्हॅल्यूच्या आधारे, 31 डिसेंबर 2024 रोजी समाप्त झालेल्या नऊ महिन्यांमध्ये अर्बन कंपनी हा घर आणि सौंदर्याशी संबंधित सेवांचा, भारतातील आघाडीचा फुल स्टॅक ऑनलाईन प्लॅटफॉर्म होता.

31 डिसेंबर 2024 च्या आकडेवारीनुसार, ही कंपनी भारतभर, संयुक्त अरब अमिरात (युएई), सिंगापूर आणि सौदी अरेबियामध्ये (केएसए) 59 शहरांमध्ये कार्यरत आहे. यापैकी 48 शहरे भारतात आहेत. कंपनीच्या प्लॅटफॉर्मवरून ग्राहक खूपच सहजपणे, त्यांना हव्या असलेल्या सेवा ऑर्डर करू शकतात, यामध्ये स्वच्छता, पेस्ट कंट्रोल, इलेक्ट्रिशियन, प्लम्बिंग, सुतारकाम, उपकरणांची सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती, रंगकाम, स्किनकेयर, हेयर ग्रूमिंग आणि मसाज थेरपी इत्यादींचा समावेश आहे. या ग्राहकांच्या सोयीनुसार, प्रशिक्षित आणि स्वतंत्र सर्व्हिस प्रोफेशनल्स पुरवतात. 2023 आणि 2024 आर्थिक वर्षांमध्ये अर्बन कंपनीने ‘नेटिव्ह’ या ब्रँड नावाने वॉटर प्युरिफायर्स आणि इलेक्ट्रॉनिक डोअर लॉक लॉन्च करून होम सोल्युशन्समध्ये विस्तार केला.

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत केले जाणार असलेले इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर (एनएसई) सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत. (लिस्टिंग तपशील)

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, मॉर्गन स्टॅनले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, गोल्डमॅन सॅश (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments