दिल्ली, ८ मे २०२५ : डीईई डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेड या कंपनीने एप्रिल २०२५ अखेरीपर्यंत एकूण १,२७४.५८ कोटींच्या ऑर्डर बुकसह दमदार कामगिरी नोंदवली आहे. एप्रिल महिन्यात ग्रुप स्तरावर ९८.३६ कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर कंपनीला प्राप्त झाल्या, तर एकूण ५१.९५ कोटींची प्रकल्प अंमलबजावणी कंपनीने केली. तेल व वायू आणि ऊर्जा या क्षेत्रांतून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर, विशेषतः डीईई थायलंडमार्फत, लक्षणीय योगदान मिळाले. विशेष म्हणजे, तेल व वायू विभाग हा यामध्ये सर्वांत मोठा घटक ठरला असून, यामध्ये ९३८.५३ कोटींच्या ऑर्डर बुकची नोंद झाली आहे. डीईई डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लि. (बीएसई: ५४४१९८ | एनएसई: DEEDEV) ही पाईपिंग सिस्टिम्समध्ये विशेष कौशल्य असलेली अभियांत्रिकी उपाययोजना पुरवणारी आघाडीची कंपनी आहे.
या यशाबाबत प्रतिक्रिया देताना कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णा ललित बंसल म्हणाले, “बाजारातील काही आव्हानांवर मात करीत आम्ही ऊर्जा, तेल व वायू आणि औद्योगिक क्षेत्रात उच्च दर्जाच्या अभियांत्रिकी उपाययोजना सतत पुरवत आहोत. आमच्या ग्राहकांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही गुंतागुंतीचे प्रकल्प अचूकतेने पूर्ण करतो, हे या कामगिरीतून दिसून येते. आमच्या जागतिक उपस्थितीचा विस्तार करीत आणि मुख्य सेवा अधिक बळकट करीत आम्ही दीर्घकालीन मूल्यनिर्मिती आणि उद्योगाच्या वाढीस चालना देण्यावर लक्ष केंद्रित करीत आहोत.”
बायोमास वीजनिर्मिती व्यवसायासाठी कंपनीचा पंजाब डिस्कॉमसोबत वीज खरेदी करार (पीपीए) अस्तित्वात आहे. मागील दोन आर्थिक वर्षांमध्ये या व्यवसायाचे सरासरी वार्षिक बीलिंग ८० कोटींचे झाले आहे. पंजाब राज्य विद्युत नियामक आयोगाने माळवा पॉवर प्रायव्हेट लिमिटेडला दर सुधारणा आदेश दिला आहे. २६.०४.२०२५ रोजी हा वीजखरेदी करार संपला. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात ३.५० प्रति युनिट दर जाहीर करण्यात आला आहे. लवकरच अंतिम आदेशाद्वारे हा दर पुन्हा ठरवण्यात येईल. ही बाब सुलभतेने समजावी म्हणून, ऑर्डर प्राप्ती व अंमलबजावणी एकसमान मानण्यात आली आहे.
एकूण प्रलंबित ऑर्डरचा मोठा साठा, वैविध्यपूर्ण ग्राहकवर्ग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढती उपस्थिती यांमुळे डीईई डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेड आगामी तिमाहींतही सातत्यपूर्ण वाढ आणि मूल्यनिर्मिती करीत राहील.


