Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedअॅक्सिस मॅक्स लाइफचा स्मार्ट व्हॅल्यू इन्कम अँड बेनिफिट एन्हान्सर प्लॅन- निश्चित उत्पन्न,...

अॅक्सिस मॅक्स लाइफचा स्मार्ट व्हॅल्यू इन्कम अँड बेनिफिट एन्हान्सर प्लॅन- निश्चित उत्पन्न, बचत आणि संरक्षणासाठी लवचिक उपाययोजना

नवी दिल्ली, 12 मे २०२५: अ‍ॅक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्स लि. (पूर्वीची अ‍ॅक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्स लि. {मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लि. म्हणून ओळखली जाणारी} (“अ‍ॅक्सिस मॅक्स लाइफ”/“कंपनी”) ने अ‍ॅक्सिस मॅक्स लाइफ स्मार्ट व्हॅल्यू इन्कम अँड बेनिफिट एन्हान्सर प्लॅनची (UIN: १०४एन१५९व्ही०१) घोषणा केली आहे. हा नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग इंडिव्हिज्युअल लाइफ इन्शुरन्स सेव्हिंग्ज प्लॅन आहे. ५ मे २०२५ पासून सर्व माध्यमांवर उपलब्ध असलेली ही योजना ग्राहकांना हमी परतावा, त्वरित रोखता आणि संरक्षण यांचे मिश्रण देण्यासाठी आहे. वेगवेगळे प्लॅन प्रकार, प्रदान पद्धती आणि फायद्याच्या पर्यायांमधून निवड करण्याची अतिरिक्त लवचिकता तसेच उत्पन्नाची निश्चितता आणि संरक्षण देऊन विविध आर्थिक प्राधान्ये पूर्ण करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. दीर्घकालीन अंतर्गत हमीसह संरचित उत्पन्न प्रवाह शोधणाऱ्या व्यक्तींसाठी हा सर्वोत्तम प्लॅन आहे.
अॅक्सिस मॅक्स लाइफ स्मार्ट व्हॅल्यू इन्कम अँड बेनिफिट एन्हान्सर प्लॅनची प्रमुख वैशिष्टे:
• खात्रीशीर परतावे: हा प्लॅन दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी जीवन विमा संरक्षणासह खात्रीशीर फायदे देतो.
• तीन लवचिक प्लॅन प्रकार: इन्स्टा वेल्थ, फ्युचर वेल्थ आणि इन्स्टा वेल्थ बूस्ट प्रकारांतर्गत उपलब्ध असले ही योजना पॉलिसीधारकांना त्यांच्या विशिष्ट आवश्यकतांनुसार बचत आणि प्रदान रचना निवडण्यास मदत करते.
• कस्टमाइझ करण्यायोग्य प्लॅन पर्याय: पॉलिसीच्या सुरूवातीला ग्राहक प्रीमियम भरण्याच्या अटी, पॉलिसीचा कालावधी, उत्पन्नाच्या प्रदानाची वारंवारता (आगाऊ/थकबाकी) आणि वार्षिक प्रीमियमच्या ५x, ७x किंवा ११x च्या मृत्यू लाभाच्या पटीत निवडू शकतात.
• तुमचे उत्पन्न व्यवस्थापित करून वाढवा: ही योजना पहिल्या पॉलिसी वर्षापासून उत्पन्नाचे लवचिक फायदे देते. त्यात वाढीव परताव्यासाठी जीवन आणि भविष्यातील उत्पन्नाचा लाभ जमा करण्याचा पर्याय आहे.
• तुमचे संरक्षण वाढवा: संरक्षण ऑफर मजबूत करण्यासाठी गंभीर आजार, अपघाती मृत्यू, अपंगत्व आणि प्रीमियम माफीसह पर्यायी बाबींचा संच देते.
• अंतर्गत संरक्षण लाभ: यात वाढीव खात्रीसाठी सीनियर सिटिझन बेनिफिट आणि कव्हर कन्टिन्युअन्स बेनिफिट समाविष्ट आहेत.
• पॉलिसी कन्टिन्युअन्स बेनिफिट (पीसीबी): एक पर्यायी वैशिष्ट्य जे पुढील प्रीमियम न भरता विमाधारकाच्या मृत्यूप्रकरणी पॉलिसीअंतर्गत भविष्यातील सर्व फायदे अबाधित राहतील याची खात्री देते. हा पर्याय सुरुवातीपासूनच निवडावा लागतो.
• कर्ज सुविधा आणि रोखता: पॉलिसीधारक पॉलिसीवर कर्ज सुविधा मिळवून शकतात आणि तात्काळ आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पन्न प्रदान टप्प्यात त्यांचे भविष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांसाठी फायदे पुढे नेण्याची लवचिकता देखील त्यांना मिळते.
या उत्पादनाच्या अनावरणाबाबत बोलताना अ‍ॅक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि उत्पादने आणि ई-वाणिज्य प्रमुख वैभव कुमार म्हणाले, “स्मार्ट व्हॅल्यू इन्कम अँड बेनिफिट एन्हान्सर प्लॅन आणून अ‍ॅक्सिस मॅक्स लाइफ हमी उत्पन्नाद्वारे विश्वासार्ह संरक्षणाचे वचन पूर्ण करत आहे. हे उत्पादन पॉलिसीधारकांना प्रीमियमच्या अटी आणि उत्पन्न प्रदानाचे प्राधान्यक्रम निवडण्यापासून, सहयोगी उत्पादनांसह त्यांचे संरक्षण कस्टमाइज करणे आणि पॉलिसी कंटिन्युअन्स बेनिफिटपर्यंत प्रत्येक टप्प्यावर लवचिकता देण्यासाठी विचारपूर्वक तयार केले आहे. ग्राहकांना जीवनविमा सुनिश्चित करताना त्यांचे उत्पन्न व्यवस्थापित करण्यास आणि वाढविण्यास सक्षम करून आम्ही एक व्यापक आणि उत्तम उपाय प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. ते गरजांचा अंदाज घेऊन आश्वासक पद्धतीने प्रत्यक्ष आर्थिक गरजा पूर्ण करते.”
अ‍ॅक्सिस मॅक्स लाइफ स्मार्ट व्हॅल्यू इन्कम अँड बेनिफिट एन्हान्सर प्लॅन ग्राहकांना निश्चित प्रदान, पर्यायी उत्पन्न निर्मिती आणि लवचिक लाभ संरचनांद्वारे आयुष्यातील अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांचे व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवतो. त्यामुळे तो ग्राहकांच्या आर्थिक प्रवासासाठी एक स्मार्ट आणि सुरक्षित पर्याय बनतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments