Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedबँक ऑफ इंडिया ने Q4FY25 साठी 82% च्या वृद्धीसह नोंदवला ₹2,626 कोटींचा...

बँक ऑफ इंडिया ने Q4FY25 साठी 82% च्या वृद्धीसह नोंदवला ₹2,626 कोटींचा निव्वळ नफा

मुंबई, 09 मे 2025 : बँक ऑफ इंडियाने Q4 FY25 आणि FY24-25 साठी आपले निकाल जाहीर केले. FY25 साठी निव्वळ नफा ₹9,219 कोटी इतका असून, यावर्षी 46% चा वृद्धीदर दिसून आला आहे. Q4FY25 साठी निव्वळ नफा 82% वाढून ₹2,626 कोटी झाला आहे. FY25 साठी ROA आणि ROE अनुक्रमे 0.90% आणि 15.27% आहे. बँकेने FY25 साठी निव्वळ व्याज उत्पन्न (NII) 6% वाढीने नोंदवले, तर FY25 साठी ग्लोबल आणि डोमेस्टिक निव्वळ व्याज मार्जिन (NIM) अनुक्रमे 2.82% आणि 3.10% आहे. Q4FY25 साठी ग्लोबल आणि डोमेस्टिक NIM अनुक्रमे 2.61% आणि 2.91% आहे.

बँकेचे ग्लोबल अ‍ॅडव्हान्सेस 13.74% ने वाढले, तर डोमेस्टिक अ‍ॅडव्हान्सेस 14.45% ने वाढले आहेत. रिटेल अ‍ॅडव्हान्सेस 19.93% ने वाढले तर MSME अ‍ॅडव्हान्सेस 18.39% ने वाढले आहे कृषि अ‍ॅडव्हान्सेस 16.30% ने वाढले तर कॉर्पोरेट अ‍ॅडव्हान्सेस 9.59% ने वाढले आहेत. ठेवी 10.65% ने वाढल्या, तर डोमेस्टिक ठेवी 11.21% ने वाढल्या आहेत. CASA ठेवी 3.86% ने वाढल्या आणि CASA रेशो 31 मार्च 2025 रोजी 40.28% राहिला आहे.

अॅसेट क्वॉलिटी पाहता नेट NPA रेशो 0.82% राहिला असून, यावर्षी 40 बेसिस पॉइंट्सने सुधारला आहे, आणि PCR 180 बेसिस पॉइंट्सने सुधारला असून 92.39% वर आहे. FY25 साठी स्लिपेज रेशो 22 बेसिस पॉइंट्सने सुधारला आहे आणि 1.36% वर आहे. FY25 साठी क्रेडिट खर्च 2 बेसिस पॉइंट्सने सुधारला असून 0.76% आहे. कॅपिटल अ‍ॅडिक्वसी. कॅपिटल अ‍ॅडिक्वसी रेशो (CAR) FY25 च्या अखेरीस 17.77% आहे.

सद्याच्या स्थितीत, BOI मोबाइल ऑम्नी नियो बँक” मोबाइल बँकिंग अ‍ॅपमध्ये 440 हून अधिक सेवा उपलब्ध आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments