Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorized‘किर्लोस्कर ऑईल इंजिन्स’ने नोंदवली १,४०१ कोटी रुपयांची आतापर्यंतची सर्वाधिक (स्वतंत्र) त्रैमासिक विक्री;...

‘किर्लोस्कर ऑईल इंजिन्स’ने नोंदवली १,४०१ कोटी रुपयांची आतापर्यंतची सर्वाधिक (स्वतंत्र) त्रैमासिक विक्री; ‘एफवाय-२०२५’च्या चौथ्या तिमाहीत विक्रीमध्ये २१ टक्के त्रैमासिक वाढ; ‘एफवाय-२०२५’च्या संपूर्ण वर्षात स्वतंत्र व्यवसायात ६ टक्के वार्षिक वाढ; संपूर्ण आर्थिक वर्षाचा स्वतंत्र निव्वळ नफा ४१६ कोटी रुपये

पुणे, १४ मे २०२५ : किर्लोस्कर ऑईल इंजिन्स कंपनीने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे व संपूर्ण आर्थिक वर्षाचे पुनरावलोकित आर्थिक निकाल आज जाहीर केले. किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड (केओईएल) (बीएसई: ५३३२९३; एनएसई: KIRLOSENG) ही इंटर्नल कम्बश्चन इंजिन्स, शेतीची उपकरणे आणि जनरेटर सेट्स बनविणारी आघाडीची कंपनी असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही तिचा ठसा उमटलेला आहे.
कंपनीच्या आर्थिक निकालांवर भाष्य करताना ‘किर्लोस्कर ऑईल इंजिन्स’च्या व्यवस्थापकीय संचालिका गौरी किर्लोस्कर म्हणाल्या, “ही तिमाही आणि एकंदरीत आर्थिक वर्ष आमच्यासाठी खूपच चांगले ठरले. या चौथ्या तिमाहीत आम्ही १,४०१ कोटी रुपयांचा महसूल मिळविण्याची कामगिरी केली. कोयलची (केओईएल) ही आतापर्यंतची सर्वाधिक त्रैमासिक विक्री आहे. आम्ही १२.१ टक्के इतका मजबूत नफाही कमावला. प्री-बाय आणि सीपीसीबी-फोर+ बदलानंतर मागणीतील तफावतीनंतरही, आमचा वार्षिक महसूल ६ टक्क्यांनी वाढून ५,०७३ कोटींवर पोहोचला. हा आमचा आतापर्यंतचा सर्वाधिक वार्षिक विक्रीचा आकडा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आमचे मार्जिन १११ बेसिस पॉइंट्सने वाढले. आमच्या बी-टू-बी आणि बी-टू-सी या दोन्ही व्यवसाय विभागांनी विक्री आणि नफा दोन्हीच्या दृष्टीने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली.
या चौथ्या तिमाहीत आमच्या ‘२x३y’ (३ वर्षांत दुप्पट वाढीच्या) प्रवासाची समाप्ती झाली. २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आम्ही कंपनीचा आकार ३ वर्षांत दुप्पट करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प (२x३y) जाहीर केला होता. त्या दृष्टिकोनातून पाहता, आमचा महसूल १.६ पट वाढला, एबिटा २.४ पट वाढला आणि नियमित कामकाजातून मिळणाऱ्या रोख रकमेची वाढ २.६ पट झाली. मागील ३ वर्षांत आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. सर्व काही नियोजनानुसार घडलेच असे नाही, पण आमच्या टीमने चपळता आणि चिकाटी दाखवत सलग तीन वर्षे उत्कृष्ट निकाल साधले. या तीन वर्षांत आम्ही एकत्रितपणे जे काही गाठले, त्याचा मला अभिमान आहे. या यशस्वी प्रवासामुळे आम्हाला पुढच्या टप्प्यातील आमच्या वाढीचा आत्मविश्वास मिळतो आहे. आम्ही ‘२बी२बी’ म्हणजे पुढील ५ वर्षांत कंपनीला २ अब्ज डॉलरच्या स्तरावर नेण्याचे धोरण आखले आहे.”
कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्षासाठी एकूण ३२५ टक्के लाभांश देण्याची शिफारस केली आहे. यामध्ये २०० टक्के अंतिम लाभांश (रु. ४.०० प्रति शेअर) समाविष्ट आहे. त्यास शेअरधारकांची मंजुरी आवश्यक आहे. याआधी १२५ टक्के अंतरिम लाभांश (रु. २.५० प्रति शेअर) दिला गेला होता.
आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील चौथ्या तिमाहीचा स्वतंत्र आर्थिक कामगिरीचा आढावा:
निव्वळ विक्री : १,४०१ कोटी रु. (मागील वर्षीच्या चौथ्या तिमाहीमध्ये, (एफवाय-२४ क्यू-फोर) विक्री झाली होती १,३७८ कोटी रु.). विक्रीमध्ये यंदा २ टक्के वार्षिक वाढ, २१ टक्के त्रैमासिक वाढ.
एबिटा : १७१ कोटी रु. (एफवाय-२४ क्यू-फोरमध्ये १७९ कोटी रु.). एबिटामध्ये यंदा ५ टक्के वार्षिक घट, ४५ टक्के त्रैमासिक वाढ.
एबिटा मार्जिन : १२.१ टक्के (एफवाय-२४ क्यू-फोरमध्ये १२.८ टक्के)
निव्वळ नफा : १०६ कोटी रु. (एफवाय-२४ क्यू-फोरमध्ये ११८ कोटी रु.). नफ्यात १० टक्के वार्षिक घट, ६२ टक्के त्रैमासिक वाढ
रोख व समकक्ष निधी (कर्ज वगळून) : ४४८ कोटी रु.
(यामध्ये ट्रेझरी गुंतवणूक समाविष्ट आहे, पण न मागितलेला लाभांश वगळलेला आहे)
आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील चौथ्या तिमाहीचा एकत्रित आर्थिक कामगिरीचा आढावा:
नियमित कामकाजातून महसूल: १,७५३ कोटी रु. (एफवाय-२४ क्यू-फोरमध्ये १,६६० कोटी रु.). महसुलात ६ टक्के वार्षिक वाढ, २१ टक्के त्रैमासिक वाढ.
निव्वळ नफा : १११ कोटी रु. (एफवाय-२४ क्यू-फोरमध्ये १३५ कोटी रु.). नफ्यात १८ टक्के वार्षिक घट, ६४ टक्के त्रैमासिक वाढ
आर्थिक वर्ष २०२४-२५ (आजपर्यंतच्या) काळातील स्वतंत्र कामगिरीचा आढावा :
निव्वळ विक्री : ५,०७३ कोटी रु. (एफवाय-२४मधील या दिवसापर्यंत ४,८०६ कोटी रु.). विक्रीत ६ टक्के वार्षिक वाढ.
एबिटा : ६५४ कोटी रु. (एफवाय-२४मधील या दिवसापर्यंत ५६७ कोटी रु.). एबिटामध्ये १५ टक्के वाढ.
एबिटा मार्जिन : १२.८ टक्के (एफवाय-२४मधील या दिवसापर्यंत ११.७ टक्के)
निव्वळ नफा : ४१६ कोटी रु. (एफवाय-२४मधील या दिवसापर्यंत ३६२ कोटी रु.). नफ्यात १५ टक्के वाढ.
आर्थिक वर्ष २०२४-२५ (आजपर्यंतच्या) काळातील एकत्रित कामगिरीचा आढावा :
नियमित कामकाजातून महसूल : ६,३४९ कोटी रु. (एफवाय-२४मधील या दिवसापर्यंत ५,८९८ कोटी रु.). महसुलात ८ टक्के वाढ.
निव्वळ नफा : ४४९ कोटी रु. (एफवाय-२४मधील या दिवसापर्यंत ४५१ कोटी रु.). नफ्यात ०.४ टक्के घट.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments