कंपनीने हा एशिया बुक रेकॉर्ड स्थापित करण्यासाठी एका आठवड्यात १७,००० हून अधिक मायक्रोअॅल्ब्युमिनुरिया चाचण्या केल्या.
या मायक्रोअॅल्ब्युमिनुरिया चाचण्यांमधील निष्पत्तींमधून ६७.०४ टक्के उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांमध्ये मूत्रपिंडाच्या संभाव्य नुकसानाची सुरूवातीची लक्षणे दिसून आली.
मुंबई, १५ मे २०२५: जेबी फार्मा भारतातील व्यक्तींमधील उच्च रक्तदाब आणि त्याचा मूत्रपिंड आरोग्यावर होणाऱ्या परिणामाविरोधात लढ्यामध्ये मोठा पुढाकार घेत आहे. १७ मे रोजी साजरा केल्या जाणाऱ्या ‘वर्ल्ड हायपरटेन्शन डे’निमित्त कंपनीने आज घोषणा केली की, कंपनीला एका आठवड्यात १७,२०२० मायक्रोअॅल्ब्युमिनुरिया चाचण्या करण्यासाठी एशिया बुक ऑफ रेकार्ड्सकडून सन्मानित करण्यात आले आहे. हे यश जेबीची सुरू असलेली मोहिम ‘वन मिशन, नेफ्रो प्रोटेक्शन’चा भाग आहे. ही मोहिम उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांमध्ये मूत्रपिंडाच्या नुकसानाचे लवकर निदान करण्याबाबत जागरूकतेचा प्रसार करण्यावर लक्ष केंद्रित करते.
”अशा अल्पावधीत सर्वाधिक मायक्रोअॅल्ब्युमिनुरिया चाचण्या करण्यासाठी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून मिळालेल्या या मान्यतेमधून भारतातील उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांसाठी सानुकूल उपचारात्मक निष्पत्ती प्रगत करण्याप्रती आमची दीर्घकालीन कटिबद्धता दिसून येते,” असे जेबी फार्माचे भारतातील व्यवसायाचे अध्यक्ष दिलीप सिंग राठोड म्हणाले. ”गेल्या ८ वर्षांमध्ये ५ लाखांहून अधिक तपासण्या करण्यात येण्यासह नुकतेच संपादित करण्यात आलेल्या यशामधून सक्रिय उच्च रक्तदाब व्यवस्थापन आणि मूत्रपिंडाच्या संरक्षणावरील आमचा अधिक फोकस दिसून येतो.”
जेबी फार्माने भारतभरात तपासणी केलेल्या एकूण व्यक्तींपैकी जवळपास १८ टक्के व्यक्तींना उच्च रक्तदाब असल्याचे निदर्शनास आले. या उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांपैकी जवळपास ६७ टक्के (किंवा दोन-तृतीयांश) रूग्णांमध्ये मूत्रपिंडाच्या संभाव्य नुकसानाची लवकर लक्षणे दिसून आली. मुंबईमध्ये जेबी फार्माने.
तपासणी केलेल्या उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांपैकी जवळपास ७४ टक्के (किंवा तीन-चतुर्थांश) रूग्णांमध्ये मूत्रपिंडाच्या संभाव्य नुकसानाची लवकर लक्षणे दिसून आली.
या विक्रमी प्रयत्नामधून लवकर हस्तक्षेपासाठी त्वरित गरज दिसून येते. जेबी फार्माचे भारतातील व्यवसायाचे क्रॉनिक क्लस्टरचे कार्यकारी उपाध्यक्ष विकास खरे म्हणाले, ”मायक्रोअॅल्ब्युमिनुरिया चाचणी उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांमधील मूत्रपिंडाच्या संभाव्य नुकसानाच्या पूर्वलक्षणांना ओळखण्यासाठी महत्त्वाची आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर मूत्रपिंड आजार होऊ शकतो. उच्च रक्तदाबाचा मूत्रपिंडाच्या आरोग्यावर तीव्र परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे लवकर मायक्रोअॅल्ब्युमिनुरिया चाचणी केल्याने मूत्रपिंडाच्या कार्याचे संरक्षण करण्यासाठी आणि रूग्ण निष्पत्ती सुधारण्यासाठी वेळेवर कृती करता येते. या विक्रमी यशासह जेबी फार्मामध्ये आम्ही ‘गुड पीपल फॉर गुड हेल्थ’ असण्याचे आमचे वचन अधिक दृढ करत आहेत.”
भारतात उच्च रक्तदाब व मधुमेह ४० ते ६० टक्के मूत्रपिंडाचे नुकसान करण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे जाणून घेत जेबी फार्मा आपली दीर्घकालीन मोहिम ‘बीपी राइट करो’च्या माध्यमातून अचूक रक्तदाब मापन आणि व्यवस्थापनाला चालना देण्याप्रती सक्रियपणे काम करत आहे. या उपक्रमांतर्गत जेबी फार्मा पुढील २-३ वर्षांत १०,००० क्लिनिक्समध्ये ब्लड प्रेशर डिवाईसेस कॅलिब्रेट करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, ज्यामुळे अचूक मोजमाप सुनिश्चित करता येतील आणि माहितीपूर्ण आरोग्यसेवा निर्णय घेता येतील.
या प्रभावी उपक्रमांच्या माध्यमातून जेबी फार्मा उच्च रक्तदाब व्यवस्थापनामधील त्यांचे नेतृत्व आणि उच्च रक्तदाब संबंधित मूत्रपिंडाचे नुकसान होण्याचा धोका असलेल्या व्यक्तींचे आरोग्य सुधारण्यासाठी समर्पितता दाखवत आहे. कंपनी डेटा-संचालित हस्तक्षेप आणि सामुदायिक सहभागाच्या माध्यमातून कार्डियोव्हॅस्कुलर केअरमध्ये सकारात्मक परिवर्तनांना चालना देण्याप्रती कटिबद्ध आहे.


