Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महापालिकेतर्फे मालमत्ता कर सवलती बाबत

पिंपरी -चिंचवड महापालिकेतर्फे मालमत्ता कर सवलती बाबत

पिंपरी, दि. ६ फेब्रुवारी २०२४ :- २०२४-२०२५ या सरकारी वर्षाकरिता करांचे व करेत्तर बाबींचे दर निश्चित करणे तसेच मालमत्ता सर्वेक्षणात नवीन आकारणी होणाऱ्या मालमत्तांचे प्रथम बिल दिलेनंतर संपूर्ण मालमत्ता कराची आगाऊ रक्कम भरणा करणा-या मालमत्ताधारकांना सामान्य करात सवलत देणेकामी महापालिका सभेकडे शिफारस करण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कासारवाडी मैला शुद्धीकरण केंद्रांतर्गत वार्षिक ठेकेदारी पद्धतीने दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी परिसर व उर्वरित भागामध्ये ड्रेनेज लाईनची व चेंबर्सची देखभाल दुरुस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दत्तवाडी, विठ्ठलवाडी परिसरात तसेच कासारवाडी मैला शुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग २ व ६ मध्ये आणि पिंपळे सौदागर, विश्वशांती कॉलनी, काटेवस्ती, गावठाण परिसरात, पिंपळे निलख, विशालनगर, कस्पटेवस्ती, वेणूनगर, दत्त मंदीर, रहाटणी, रामनगर, शिवराजनगर येथील जलःनिसारण नलिका व मॅनहोल चेंबर्सची दुरूस्ती व देखभाल करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments