नेल्से इंडियाने मॅगी प्रोफेशनलच्या वनस्पती-आधारित श्रेणीची चाचणी करण्यासह लाँच करण्यासाठी भारतातील लोकप्रिय नेबरहूड कॅफे सोशलसोबत सहयोग केला आहे. उत्पादने नवीन इरेसिस्टिबल मेनू तयार करण्यासाठी वापरण्यात आली आहेत. हे मेन्यू तीन महिन्यांसाठी दिल्ली (एनसीआर), मुंबई, बेंगळुरू, पुणे आणि चंदिगड येथील ४१ सोशल व ४० बॉस बर्गर आऊटलेट्समध्ये उपलब्ध आहेत.
वनस्पती-आधारित श्रेणी विशेषत: शेफ्ससाठी विकसित करण्यात आली आहे आणि त्यामध्ये दोन ऑफरिंग्जचा समावेश आहे – बर्गर पॅटी आणि मिन्स, जे मांस-आधारित भोजनांसाठी पर्याय आहेत. ही उत्पादने चिकनसारखाच स्वाद देतात, ज्यामधून प्रचलित बाऊंस व ज्यूसीनेसचा अनुभव मिळतो. ही उत्पादने प्रथिने व फायबरचे स्रोत आहेत आणि नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉलपासून मुक्त आहेत. ही श्रेणी जागतिक सांस्कृतिक अनुभव आणि सर्वोत्तम खाण्याच्या सवयींसह तरूण ग्राहकांच्या सर्वसमावेशक पसंतींची पूर्तता करते.
सोशलच्या नवीन इरेसिस्टिबल मेन्यूमध्ये सर्वोत्तम व नाविन्यपूर्ण पाककला आणि स्वादिष्ट संयोजनांचा समावेश आहे, जसे सेन्सेशनल सीख #NotGuilty – सीख आणि तुम्हाला अत्यंत रूचकर वनस्पती-आधारित कबाबचा आस्वाद मिळेल, जे पुदिन्याची चटणी आणि कच्चा कांद्यासह सर्व्ह केले जाते. चिली #NotChicken – आम्ही या स्वादिष्ट वनस्पती-आधारित चंक्समध्ये मिरचीची चटणी मिक्स केली आहे, ज्यामुळे तुम्हाला चिली सॉसचा आस्वाद मिळेल आणि गार्डन क्लब सँडविच – वेजी व वनस्पती-आधारित ट्रिटसह स्वादिष्ट क्लब सँडविच.
बॉस बर्गरमधील नवीन मेन्यूमध्ये सर्वोत्तम पर्यायांचा समावेश आहे, जसे द आयअॅमबॉसिबल चीजबर्गर – वनस्पती-आधारित चीजबर्गर, जो इतका बोल्ड व ब्लॉकबस्टर आहे की तुम्हाला अधिकाधिक खायला आवडेल आणि क्रम्ब डी ला अॅवो बर्गर – क्रम्ब केलेल्या पॅटीवर स्मॅश केलेले अॅवाकॅडो – बोल्ड, क्रकीमी, टेस्टी आणि प्लाण्टी-फुल.
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत नेल्से इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन म्हणाले, ”आम्हाला लिमिटेड पीरियड मेन्यूच्या माध्यमातून मॅगी प्रोफेशनलची नवीन वनस्पती-आधारित श्रेणी सादर करण्यासाठी सोशलसोबतच्या आमच्या सहयोगाची घोषणा करण्याचा आनंद होत आहे. हा सहयोग बहुमूल्य ग्राहकांना घरामध्ये व घराबाहेर अधिक फूड निवडी प्रदान करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेचा भाग आहे. आम्हाला विश्वास आहे की, शेफ्स या श्रेणीसह कूकिंगचा आनंद घेतील आणि ग्राहकांसाठी सर्वोत्तम पाककला तयार करतील.”
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत इंप्रेसारियो एंटरटेन्मेंट अॅण्ड हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक रियाज अमलानी म्हणाले, ”आम्हाला नेस्लेसोबत हा पाककला प्रवास सुरू करण्याचा आनंद होत आहे. या सहयोगामध्ये सोशलचे पाककला कौशल्य आणि नेस्ले इंडियाची नाविन्यपूर्ण वनस्पती-आधारित श्रेणी एकत्र आले आहेत. नवीन इरेसिस्टिबल मेन्यूमधून अपवादात्मक डायनिंग अनुभव प्रदान करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते, तसेच डायनिंगप्रती अधिक शाश्वत, जागरूक व नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाच्या दिशेने मोठे पाऊल आहे. आमचा विश्वास आहे की, हा सहयोग भारतात वनस्पती-आधारित डायनिंगच्या क्षमतांना नव्या उंचीवर घेऊन जाईल आणि आमच्या अतिथींना सर्वोत्तम, संवेदनशील फ्लेवर्सचा अनुभव देईल.”
अतिथी आता २७ जानेवारी २०२४ पासून निवडक सोशल आऊटलेट्समध्ये नवीन इरेसिस्टिबल मेनूचा आस्वाद घेऊ शकतात आणि डॉटपे, स्विगी व झोमॅटोच्या माध्यमातून बॉस बर्गरमधून डिलिव्हरी घेऊ शकतात.
*नवीन इरेसिस्टिबल मेन्यू असलेले सोशलचे आऊटलेट्स:
शहर
आऊटलेट
मुंबई
कॅपिटल सोशल
कुलाबा सोशल
वर्सोवा सोशल
गोरेगाव सोशल
खार सोशल
विक्रोळी सोशल
कार्टर रोड सोशल
पवई सोशल
वाशी सोशल
ठाणे सोशल
चेंबूर सोशल
मालाड सोशल
दादर सोशल
वडाळा सोशल
नेस्को सोशल
घाटकोपर सोशल
दिल्ली एनसीआर
द्वारका सोशल
नेहरू प्लेस सोशल
सायबर हब सोशल
वसंत कुंज सोशल
नोएडा सोशल
साकेत सोशल
हौज खास सोशल
ऐरो सिटी सोशल
सिव्हिल लाइन्स सोशल
आयएफसी सोशल गुरगाव
सेक्टर ८५ सोशल
बेंगळुरू
व्हाइटफिल्ड सोशल
चर्चस्ट्रीट सोशल
कोरमंगला सोशल
सर्जापूर सोशल
इंदिरानगर सोशल
न्यू बेल रोड सोशल
हेब्बल सोशल
पुणे
विमान नगर सोशल
एफसी सोशल
द मिल सोशल
कोरेगाव पार्क सोशल
चंदिगड
सेक्टर ७ सोशल
एलाण्टे सोशल
नवीन इरेसिस्टिबल मेनू असलेले बॉस बर्गर आऊटलेट्स
शहर
आऊटलेट
मुंबई
लोअर परळ
वर्सोवा
वाशी
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स
कार्टर रोड
कुलाबा
ठाणे
गोरेगाव
चेंबूर
विक्रोळी
पवई
वडाळा
दादर
मालाड
नेस्को
घाटकोपर
खार
वरळी
दिल्ली एनसीआर
नेहरू प्लेस
द्वारका
नोएडा
वसंत कुंज
सायबर हब
साकेत
हौज खास
एरो सिटी
सिव्हिल लाइन्स
गुरगाव
सेक्टर ८५
बेंगळुरू
कोरमंगला
सर्जापूर
इंदिरानगर
न्यू बेल रोड
हेब्बल
पुणे
विमान नगर
एफसी रोड
ढोले पाटील रोड
कोरेगाव पार्क
चंदिगड
सेक्टर ७
एलाण्टे


