Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedदुचाकी वाहनांच्या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकाकरिता फेसलेस सुविधा

दुचाकी वाहनांच्या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकाकरिता फेसलेस सुविधा

पुणे, दि. १९ : पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने दुचाकी वाहनांकरिता ‘एमएच १२-वायई’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे; मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन आरक्षित करण्याकरिता २० मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून फेसलेस सुविधा सुरु होणार आहे.

पसंती क्रमांक शुल्क ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार नाही. क्रमांक आरक्षित करण्याकरिता https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर, नाव व आधार संलग्नित मोबाईल क्रमांक टाकून नाव नोंदणी करावी व त्यानंतर अर्ज व शुल्क भरणा करून पसंती क्रमांक आरक्षित करता येईल, असेही सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments