एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड (हा फंड) — जो लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करणारी एक ओपन-एंडेड डायनॅमिक इक्विटी योजना आहे — या योजनेने विविध बाजारचक्रांमधून गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन संपत्ती निर्माण केली आहे. 1 जानेवारी 1995 रोजी स्थापनेपासून, या फंडाने 31 मार्च 2025 पर्यंत 18.82% वार्षिक सरासरी संमिश्र वाढ दर (सीएजीआर) नोंदवली आहे. स्थापनेपासून ₹1,00,000 ची गुंतवणूक सुमारे ₹1.84 कोटींवर पोहोचली असती, जी बेंचमार्क निफ्टी 500 टीआरआय पेक्षा ₹1.51 कोटींनी अधिक आहे. तसेच, जर स्थापनेपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व्यवसायदिवशी ₹10,000 ची एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) केली गेली असती (एकूण गुंतवणूक ₹36.20 लाख), तर ती गुंतवणूक 31 मार्च 2025 पर्यंत सुमारे ₹20.24 कोटी झाली असती.
मागील तीन दशकांमध्ये या फंडाने अनेक बाजारचक्रांचा यशस्वीपणे सामना करत, मजबूत मूलभूत तत्वांवर आधारित गुणवत्तापूर्ण कंपन्यांमध्ये दीर्घकालीन वाढीची क्षमता पाहणारी गुंतवणूक तत्त्वज्ञान प्रभावीपणे सादर केली आहे. उच्च गुणवत्ता असलेल्या व्यवसायांवरील भर, मूल्यांकनातील शिस्त आणि दीर्घकालीन धोरणात्मक दृष्टिकोन यामुळे हा फंड गुंतवणूकदारांमध्ये एक विश्वासार्ह पर्याय ठरला आहे.
एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडची गुंतवणूक रणनीती ही तळापासून सुरू होणाऱ्या (बॉटम-अप) दृष्टिकोनावर आधारित असून, गुणवत्तापूर्ण कंपन्यांची निवड आणि वाजवी मूल्यांकन हे तिचे मुख्य आधारस्तंभ आहेत. मध्यम ते दीर्घकालीन काळात ठोस वाढीची क्षमता असलेल्या कंपन्यांची ओळख पटवून, त्यामध्ये गुंतवणुकीस प्राधान्य दिले जाते. उद्योग व व्यवसायचक्राचे सखोल विश्लेषण, तसेच संबंधित क्षेत्रात कंपनीची स्थिती यांचा बारकाईने विचार करून, जोखमीचा समतोल राखणारी पोर्टफोलिओ धोरणे राबवली जातात. यामुळे फंडाचे गुंतवणूक धोरण अधिक रणनीतिक, शिस्तबद्ध आणि दीर्घदृष्टीने विचार करणारे ठरते.
एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडने 4 मुख्य स्तंभांवर आधारित एक संरचित जोखमीचे व्यवस्थापन दृष्टिकोन स्वीकारला आहे. नियामक आणि आंतररिक जोखीम सुरक्षा नियमांचे पालन करून फंड आपल्या नियुक्त्या आणि उद्दिष्टांसह सुसंगत राहतो, जे रिअल-टाइम तपासणी आणि सतत निरीक्षणाद्वारे समर्थित आहे. संशोधनावर आधारित गुंतवणूक प्रक्रिया, जी एक इन-हाऊस टीमद्वारे समर्थित आहे, ती मात्रात्मक आणि गुणवत्तात्मक दोन्ही बाबींचा समतोल राखते. पोर्टफोलिओ निर्मितीची रणनीती उद्योग चक्र आणि कंपनीच्या स्थितीचा विचार करून पोजिशन साईझिंगचे मूल्यांकन करते. विविध क्षेत्रांमध्ये आणि थीममध्ये विविधता निर्माण करून, तसेच बाजार कॅपिटलायझेशन्समध्ये लवचिकता राखून, फंड आपली प्रगतीशील आणि चांगल्या प्रकारे व्यवस्थापित गुंतवणूकांच्या तत्त्वज्ञानावर ठाम राहतो.
श्री. नवनीत मुनोत, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, एचडीएफसी एएमसी म्हणाले की, “एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडचा गेल्या तीन दशकांचा प्रवास आमच्या शिस्तबद्ध गुंतवणूक तत्त्वज्ञानाचा आणि गुंतवणूकदारांच्या संपत्ती निर्मितीबाबतच्या आमच्या अखंड बांधिलकीचा ठोस पुरावा आहे. फंडाने विविध बाजारचक्रांचा यशस्वीपणे सामना केला असून, प्रत्येक वेळेस अधिक मजबूतपणे पुढे आला आहे, जे आमच्या गुंतवणूक प्रक्रियेतील लवचिकतेचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. फंडाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आमच्या दीर्घकालीन मूल्यनिर्मितीवर केंद्रित असलेल्या दृष्टिकोनाला अधिक बळ मिळाले आहे.”
रोशी जैन, वरिष्ठ फंड व्यवस्थापक, एचडीएफसी एएमसी म्हणाल्या “या फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करण्यात आम्हाला मोठा अभिमान वाटतो. दीर्घकालीन आणि टिकाऊ वाढीच्या संधी असलेल्या उच्च गुणवत्तेच्या व्यवसायांची ओळख पटवण्यावर आमचे सातत्यपूर्ण लक्ष केंद्रित राहिले आहे. एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडद्वारे, संतुलित आणि विविधीकृत दृष्टिकोन ठेवत, जोखमीच्या तुलनेत अधिक चांगले परतावे देण्याच्या आमच्या उद्दिष्टाशी आम्ही कटिबद्ध आहोत.”


