२० मे २०२५
दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशात स्थित आर्सेलर मित्तलचा सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प, १ गिगावॅटचा सौर आणि पवन प्रकल्पातून अलीकडेच आर्सेलर मित्तलचा निप्पॉन स्टीलसोबतचा ६०/४० भारतीय स्टीलमेकिंग संयुक्त उपक्रम असलेल्या एएम/एनएस इंडियाला स्वच्छ वीज पुरवण्यास सुरुवात केली आहे.
हा प्रकल्प ०.७ अब्ज डॉलर्सचा हा प्रकल्प – आर्सेलर मित्तलची उपकंपनी असलेल्या एएम ग्रीन एनर्जीकडून विकसित, बांधला आणि कार्यान्वित केला गेला आहे – त्यामुळे एएम/एनएस इंडियाच्या कार्बन उत्सर्जनात दरवर्षी १.५ दशलक्ष टनांची घट होण्याची अपेक्षा आहे. तसेच एएम/एनएस इंडियाने २०३० पर्यंत (२०२१ च्या बेसलाइनच्या विरुद्ध) उत्पादित केलेल्या स्टीलची कार्बन तीव्रता २०% ने कमी करण्याचे लक्ष्य साध्य केले आहे.
भारताच्या अक्षय्य ऊर्जा प्रकल्पाला हायब्रिड प्रकल्प म्हणून विकसित करण्यात आले आहे. त्यात १ गिगावॅट सौर आणि पवन ऊर्जा क्षमतेचे तृतीय-पक्ष हायड्रो पंप्ड स्टोरेज सोल्यूशनसह एकत्रीकरण केले आहे (सध्या चाचणी सुरू आहे आणि जून २०२५ पर्यंत कार्यान्वित होणार आहे). त्यामुळे प्रकल्प अखेर किमान २५० मेगावॅट २४ तास वीज पुरवेल – जो सतत ऊर्जा उत्पादनासाठी महत्त्वाचा आहे. गुजरातमधील हजिरा येथील एएम/एनएस इंडियाच्या स्टील प्लांटमध्ये सध्याच्या ऊर्जेच्या गरजांपैकी २०% पेक्षा जास्त ऊर्जा ते पुरवेल.
हे सौर ऊर्जा केंद्र तब्बल २,४०० एकरवर पसरलेले आहे. त्यात १,७०० एकरपेक्षा जास्त फिफा आकाराचे फुटबॉल मैदाने सामावू शकेल – आणि पवन ऊर्जा केंद्र ७०० एकरवर पसरलेले आहे. आता पूर्णपणे कार्यान्वित आणि नेमप्लेट क्षमतेवर चालणारी सुमारे १.५ दशलक्ष सौर पॅनेल आणि ९१ पवन टर्बाइन दरवर्षी २.५ अब्ज किलोवॅट-तास (केडब्ल्यूएच) वीज निर्माण करतील. ही जवळ-जवळ १ कोटी भारतीय घरांना वीज देण्याइतके आहे.
आर्सेलरमित्तलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य मित्तल म्हणाले की,
“आर्सेलर मित्तलसाठी अक्षय ऊर्जा निर्मितीमध्ये गुंतवणूक करणे हे एक नवीन महत्वपूर्ण व्यवसाय क्षेत्र आहे. ते आमच्या स्टीलमेकिंग ऑपरेशन्ससाठी किफायतशीर स्वच्छ ऊर्जा सुरक्षा प्रदान करते आणि आमच्या डीकार्बोनायझेशन उद्दिष्टांना पाठिंबा देते.
“भारत प्रकल्प हा आमच्या प्रमुख अक्षय ऊर्जा प्रकल्पांपैकी पहिला प्रकल्प आहे, जो कार्यान्वित झाला आहे. हा सुमारे १८ महिन्यांत कार्यक्षमतेने आणि सुरक्षितपणे पूर्ण झालेला एक मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे – भारतातील या प्रमाणात प्रदान केलेल्या सर्वात जलद प्रकल्पांपैकी एक असून त्यातून आता एएम/एनएस इंडियाला स्वच्छ वीज पुरवली जात आहे. प्रकल्पात सहभागी असलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन. त्याची यशस्वी अंमलबजावणी भारतात आमची सुरक्षित आणि शाश्वत पद्धतीने उपस्थिती वाढवण्याची वचनबद्धता दर्शवते.”
भारत अक्षय ऊर्जा प्रकल्प हा आर्सेलर मित्तल विकसित करत असलेल्या अनेक अक्षय ऊर्जा प्रकल्पांपैकी एक आहे. एकूणात कंपनीचे भारत, ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये २.३ गिगावॅट क्षमतेचे अक्षय ऊर्जा प्रकल्प सुरू आहेत.
हे आर्सेलर मित्तलच्या धोरणात्मक वाढीच्या प्रकल्पांचा देखील एक भाग आहे. त्यातून कंपनी २०२७ च्या अखेरीस पूर्ण झाल्यावर १.९ अब्ज डॉलर्सचा वाढीव वार्षिक ईबीआयटीडीए निर्माण करण्याची अपेक्षा करते.
ENDS
आर्सेलरमित्तल बाबत
आर्सेलर मित्तल ही जगातील आघाडीच्या एकात्मिक स्टील आणि खाण कंपन्यांपैकी एक आहे. तिची उपस्थिती ६० देशांमध्ये आहे आणि १५ देशांमध्ये प्राथमिक स्टील निर्मितीचे काम करते. ही युरोपमधील सर्वात मोठी स्टील उत्पादक कंपनी आहे, अमेरिकेतील सर्वात मोठी आहे आणि आशियामध्ये तिच्या संयुक्त उपक्रम एएम/एनएस इंडियाद्वारे वाढती उपस्थिती आहे. आर्सेलर मित्तलने ऑटोमोटिव्ह, अभियांत्रिकी, बांधकाम आणि यंत्रसामग्री उद्योगांसह विविध ग्राहकांना आपली उत्पादने विकली आणि २०२४ मध्ये $६२.४ अब्ज महसूल मिळवला, ५७.९ दशलक्ष मेट्रिक टन कच्चे स्टील आणि ४२.४ दशलक्ष टन लोहखनिजाचे उत्पादन केले.
आमचा उद्देश लोकांसाठी आणि पृथ्वीसाठी स्मार्ट स्टील्स तयार करणे आहे. कमी ऊर्जा वापरणाऱ्या, कमी कार्बन उत्सर्जित करणाऱ्या आणि खर्च कमी करणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रक्रिया वापरून बनवलेले स्टील्स. स्वच्छ, मजबूत आणि पुन्हा वापरता येणारे स्टील्स. या शतकात समाज बदलत असताना त्यांना आधार देणाऱ्या अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधांसाठी स्टील्स. आमच्या केंद्रस्थानी असलेल्या स्टीलसह, आमच्या कल्पक कर्मचाऱ्यांसह आणि हृदयात असलेल्या उद्योजकीय संस्कृतीसह, आम्ही तो बदल घडवून आणण्यासाठी जगाला पाठिंबा देऊ.
आर्सेलरमित्तल न्यूयॉर्क (एमटी), अॅमस्टरडॅम (एमटी), पॅरिस (एमटी), लक्झेंबर्ग (एमटी)च्या स्टॉक एक्सचेंजमध्ये आणि बार्सिलोना, बिलबाओ, माद्रिद आणि व्हॅलेन्सिया (एमटीएस)च्या स्पॅनिश स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहे.
http://corporate.arcelormittal.com/
आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडियाबाबत (एएम/एनएस इंडिया)
आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया (एएम/एनएस इंडिया) ही जगातील दोन आघाडीच्या स्टील उत्पादक संस्था आर्सेलर मित्तल आणि निप्पॉन स्टील यांचा संयुक्त उपक्रम आहे. ती भारतातील एक आघाडीची एकात्मिक फ्लॅट कार्बन स्टील उत्पादक कंपनी असून तिच्याकडे अत्याधुनिक डाउनस्ट्रीम सुविधांसह वार्षिक ९० लाख टन कच्च्या स्टीलची क्षमता आहे. ती मूल्यवर्धित स्टीलसह फ्लॅट स्टील उत्पादनांची पूर्णपणे वैविध्यपूर्ण श्रेणी तयार करते आणि त्याची पेलेट क्षमता २० दशलक्ष टन आहे.


