दर वर्षीप्रमाणे या ही वर्षी ओम डान्स अकॅडमीचे प्रशिक्षक ओंकार शिंदे अनुभव 2025 हा नृत्यमय कार्यक्रम सादर करणार आहेत.
ओंकार शिंदे अनेक मराठी हिंदी चित्रपटाचे , मराठी वाहिन्यांवरील कार्यक्रमांचे नृत्य दिग्दर्शक असून 15 वर्षाहून अधिक नृत्य क्षेत्रातील त्यांचा अनुभव आहे.
दर वेळेस एक नवी संकल्पना घेऊन नृत्या द्वारे एक कथा सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
या ही वर्षी ती –स्वतःच्या कर्तृत्वाची लेखिका या संकल्पने वर आधारित नृत्य सादर होणार आहेत, आजी आणि नातीच्या संवादातून उलगडणारा स्त्रीचा जीवनप्रवास आणि तिचं समाजातील महत्व अधोरेखित करणारा अतिशय नेत्र सुखद असा नृत्यमय कार्यक्रम शनिवार 24 मे संध्याकाळी 6 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सादर होणार आहे.
या कार्यक्रमात निरनिराळ्या वयोगटातील 100 हुन अधिक मुले व महिलानी भाग घेतला आहे.
अभिनेत्री
श्रुती मराठे, चित्रपट निर्माते संदीप मोहिते पाटील, नगरसेवक महेश आनन्द,
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
चुकवू नये अशा या नृत्यमय कार्यक्रमाच्या पासेससाठी संपर्क क्रमांक – अतुल – 7972523206


