Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedपंचकोशीय विकासासाठी* *वाचन आणि खेळ महत्वाचे* अभिनेता प्रवीण तरडे...

पंचकोशीय विकासासाठी* *वाचन आणि खेळ महत्वाचे* अभिनेता प्रवीण तरडे यांचे मत

शारीरिक, मानसिक, बौद्धिक ऊर्जात्मक आणि आध्यात्मिक अशा पंचकोशीय विकासासाठी वाचन आणि खेळ महत्त्वाचे असल्याचे मत अभिनेता प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे महापालिका, पुणे पुस्तक महोत्सव आणि संवाद पुणे यांच्या वतीने दिनांक 22 ते 25 मे या कालावधीत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्रात ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत ‘आपलं अंगण’ या उपक्रमाची झलक आज संभाजी उद्यानात पुणेकरांना पाहायला मिळाली. त्यावेळी तरडे बोलत होते.

अभिनेत्री तेजस्विनी भोईर, सुनील महाजन, अर्चना सोनवणे, सरोज पांडे, राजश्री जायभाय, प्रसाद मिराजदार, अनिल बेलकर, विजयेंद्र चाबुकस्वार यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वांनी लहान मुलांबरोबर खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला.

तरडे म्हणाले, “आजकाल लहान मुलांमध्ये मोबाईलच्या वापराचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. त्यामुळे त्यांचा ‘स्क्रीन टाईम’ वाढला असून ‘अटेंशन स्पॅन’ कमी झाला आहे. या सगळ्याचे परिणाम मुलांच्या अभ्यासावर आणि व्यक्तिमत्व विकासावर होत आहेत. त्यासाठी पालकांनी वेळीच काळजी घेऊन मुलांना सकस वाचन आणि भरपूर खेळ खेळण्याची आवड निर्माण करणे आवश्यक आहे.”

भोईर म्हणाल्या, “विटी दांडू, चाक फिरवणे, दोरीवरच्या उड्या, गोटया, भोवरा फिरवणे, भातुकली असे पारंपरिक खेळ खेळत आम्ही लहानाचे मोठे झालो. या खेळांमुळे एकाग्रता, स्मरणशक्ती, निरीक्षण शक्ती, स्नायूंची लवचिकता आदी क्षमता विकसित होण्यास मदत झाली. मागच्या पिढीतील पालकांना आणि त्यांच्या मुलांना हे खेळ पुन्हा अनुभवण्याची विनामूल्य संधी पुणे बाल वाचन जत्रेत मिळणार आहे. आम्ही हे खेळ खेळलो, तुम्हीही खेळा आणि समृद्ध व्हा, असे आवाहन करते.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments