Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedज्येष्ठांशी आरोग्य संवाद या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्येष्ठांशी आरोग्य संवाद या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, 21 मे २०२५ : लोकमान्य हॉस्पिटल्स आणि फेस्कॉम, ॲसकॉक, जनसेवा फाऊंडेशन, विवेक व्यासपीठ, ज्येष्ठ पर्व व कुसुमाग्रज कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मातृत्व दिनानिमित्त कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाटयगृह येथे ज्येष्ठांशी आरोग्यसंवाद या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात शल्यचिकित्सक डॉ. सुप्रशांत कुलकर्णी, मेंदू शल्यचिकित्सक डॉ. रितेश भल्ला, फिजिशियन जॉईंट रिप्लेसमेंट व आर्थोपेडिक सर्जन डॉ.सतीश काळे आणि सिनियर कन्सल्टंट फिजिशियन डॉ. अनिकेत जोशी यांनी आरोग्यविषयक चर्चासत्राद्वारे मार्गदर्शन केले. या सत्रामध्ये लोकमान्य हॉस्पिटल्स तर्फे डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी तज्ज्ञांशी संवाद साधला. लोकमान्य हॉस्पिटल्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनप्रीत सिंग सोहाल, फेस्कॉम महाराष्ट्र चे माजी अध्यक्ष अरुण रोडे, फेस्कॉम चे सचिव चंद्रकांत महामुनी, एस्कॉप चे अध्यक्ष दिलीप पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मनप्रीत सिंग यांनी लोकमान्य हॉस्पिटल्स च्या वाटचालीविषयी माहिती दिली. याप्रसंगी विविध सवलती आणि लाभ असलेल्या ज्येष्ठांसाठीच्या एका विशेष हेल्थ कार्ड चे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कार्यक्रमात ज्येष्ठांसाठी फॅन्सी ड्रेस उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
जो पर्यंत व्यायाम तो पर्यंत सर्व उत्तम …….

आरोग्यविषयक चर्चासत्रामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, चयापचय संबंधित आजार, स्थूलता, हृदयविकार, डिमेंशिया, अल्झायमर, संधिवात, हाडांमधील ठिसूळपणा, सांध्यांचे विकार, काही कारणामुळे घरी पडल्याने झालेले फ्रॅक्चर्स इत्यादी ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित आरोग्य समस्यांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यातील अनेक आजार हे जीवनशैलीशी निगडित असतात. म्हणूनच नियमित तपासण्या, लवकर निदान आणि योग्य उपचाराबरोबरच व्यायाम , शरीराची हालचाल, योग्य आहार याचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. आपल्याला झेपेल असा व्यायाम आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल केल्यास सर्व उत्तम राहील असा विश्वास डॉक्टरांनी दिला.

जीवनशैलीत बदल याबाबत उदाहरण देतांना सिनियर कन्सल्टंट फिजिशियन डॉ. अनिकेत जोशी म्हणाले की आपल्या ताटात मीठ वाढले जाते पण पूर्वी शारीरिक कष्ट, त्यामुळे येत असलेला घाम यामुळे सोडिअमची गरज शरीराला भासत असे. पण आता आपण एसी चा सतत वापर करत आहोत, शारीरिक हालचाल देखील तेवढी नाही, पण चव मात्र तीच आहे, म्हणून आपण अतिरिक्त मीठ खात राहतो आणि समस्या निर्माण होतात. अशा अनेक बाबतीत बदल आवश्यक आहेत. व्यायाम आणि जीवनशैलीत बदल केल्यास आरोग्य उत्तम राहिल

चुकीच्या जीवनशैली बाबत आणखी एक उदाहरण देत शल्यचिकित्सक डॉ. सुप्रशांत कुलकर्णी म्हणाले की शौचाला जातांना मोबाईल घेऊन जाणे टाळावे . त्यामुळे गुद्दद्वाराच्या समस्या निर्माण होऊ शकतात. शौचातून रक्त पडत असल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा

मेंदू शल्यचिकित्सक डॉ.रितेश भल्ला यांनी डिमेंशिया, अल्झायमर व मेंदूविषयक आजारांबाबत माहिती दिली .

आर्थोपेडिक सर्जन डॉ. सतीश काळे यांनी काही वेळा आरोग्य संबंधित समस्यांमुळे घरी पडल्याच्या घटना घडतात. त्यामुळे खुब्याचे फ्रॅक्चर, हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर अशा समस्या सामान्यपणे दिसून येतात. आपली हाडे आरोग्यदायी असावीत यासाठी योग्य प्रमाणात प्रथिने, ड जीवनसत्वासाठी सूर्यप्रकक्षाशी संपर्क आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुठल्याही परिस्थितीत शरीराची हालचाल किंवा व्यायाम हवा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments