आघाडीची जागतिक पेंट्स आणि कोटिंग्स कंपनी आणि Dulux पेंट्सची निर्माती AkzoNobel India ने ‘Dulux Maestro’ या नावाने भारतातील आर्किटेक्ट्स आणि डिझायनर समुदायाला सक्षम बनवण्यासाठी AkzoNobel ची एक विशेष इकोसिस्टम सादर करत असल्याची घोषणा केली आहे. आजच्या ‘नया भारत’ साठी आधुनिक वास्तू आणि निवासस्थळांना आकार देत असलेल्या व्यावसायिकांना यामुळे मदत होईल.
नुकत्याच झालेल्या एका बाजरपेठीय अभ्यासानुसार* भारतीय इंटेरियर डिझाइन बाजारपेठेचा विकास दर 14.3% इतका असून तो 2030 पर्यंत 81.2 अब्ज अमेरिकन डॉलर इतका पोहोचेल असा अंदाज आहे. 2050 पर्यंत भारतातील शहरीकरण 50% च्या पुढे जाण्याची शक्यता आहे आणि त्यासोबत विशेषतः टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये निवासासाठी सानुकूल आणि व्यक्तिगत राहण्यासाठी जागेची मागणी झपाट्याने वाढत आहे,.
‘Dulux Maestro’ च्या सादरीकरणाविषयी माहिती देताना Akzo Nobel India चे कार्यकारी संचालक रोहित टोटला म्हणाले, “आजच्या युगात ग्राहक अत्यंत वैयक्तिकृत आणि ट्रेंडी निवासस्थानांची मागणी करत आहेत आणि त्यामुळे ते आर्किटेक्ट्स व इंटेरियर डिझायनर्सच्या कौशल्याचा अधिकाधिक वापर करत आहेत. AkzoNobel च्या गुणवत्तेची आणि नाविन्यपूर्णतेची 70 वर्षांची परंपरा लक्षात घेता Dulux Maestro केवळ एखादं उत्पादन नाही तर डिझाइन व्यावसायिकांना महानगरांमध्ये आणि त्यापलीकडे जात नव्या भारतातील डिझाइन-प्रेमी लोकांसाठी जागांचे नव्याने डिझाइन करण्यासाठी प्रेरित करणारी बांधिलकी आहे.”
आर्किटेक्ट्स आणि इंटेरियर डिझायनर्सच्या गरजा लक्षात घेऊन काटेकोरपणे डिझाइन करण्यात आलेल्या Dulux Maestro प्रोग्राममध्ये एंड-टू-एंड बिझनेस सपोर्टसोबत Dulux च्या कलर, व्हिज्युअलायझेशन आणि पर्सनलायझेशन या क्षेत्रातील जागतिक पातळीवरील माहिती, अनुभवांचा समावेश आहे. साइट इन्स्पेक्शन, ऑन-साइट सॅम्पलिंग, एक्सपर्ट कलर कन्सल्टन्सीपासून ते Dulux Colour Plug-in सह 2,000 पेक्षा अधिक शेड्ससह अॅडव्हान्स डिजिटल व्हिज्युअलायझेशन, टेक्निकल ट्रेनिंग, ऑन-डिमांड प्रिव्ह्यूज आणि Dulux प्रमाणित उच्च दर्जाच्या कॉन्ट्रॅक्टर्स व कोटेशन टूल्स यांपर्यंत — हा प्रोग्राम प्रत्येक टप्प्यावर व्यावसायिकांना सक्षम बनवतो.
Dulux Maestro प्रोग्रॅम आपल्या सदस्यांसाठी खास लाभही सादर करत आहे. यात नवनवीन गोष्टींची प्राथमिक माहिती, व्यावसायिक सहयोग, रंगांविषयक माहिती, नवनव्या प्रवाहाविषयी कार्यशाळा आणि खास रिवॉर्ड्स यांचा समावेश आहे — हे सगळं Dulux च्या प्रीमियम डेकोरेटिव्ह पेंट्स पोर्टफोलिओ आणि समर्पित सपोर्ट टीमच्या पाठबळावर आधारित आहे.
2000 हून अधिक आर्किटेक्ट्स आणि इंटेरियर डिझायनर्स या प्रोग्रॅमचा भाग झाले असून Dulux Maestro प्रोग्रॅम पहिल्या टप्प्यात 5 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशांतील 16 प्रमुख शहरांमध्ये सुरू आहे. यात महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद; गुजरातमधील अहमदाबाद, बडोदा, सूरत, राजकोट आणि भावनगर; पश्चिम बंगालमधील कोलकाता, हावडा, हुगळी आणि बर्धमान; मध्य प्रदेशातील भोपाळ आणि इंदौर; छत्तीसगढमधील रायपूर; उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि नोएडा; आणि गोवा यांचा समावेश आहे.
भारतातील वाढत्या डिझाइन व्यावसायिक समुदायाप्रती असलेली AkzoNobel ची बांधिलकी आणखी मजबूत करत हा प्रोग्रॅम 2025 च्या अखेरीपर्यंत सर्व भागांतील 40 पेक्षा अधिक शहरांमध्ये विस्तारण्याची AkzoNobel ची योजना आहे.
स्त्रोत – P&S Intelligence report 2025


