Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedहगवणे कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालावा - संदीप खर्डेकर*. *वैष्णवीची आत्महत्या (...

हगवणे कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालावा – संदीप खर्डेकर*. *वैष्णवीची आत्महत्या ( की हत्या ) बाळ पळविणे, बाळाला अज्ञाताच्या हाती ताब्यात देणे, मयुरी चा छळ करणारे ह्या सर्वांना संघटित गुन्हेगारी ची कलमे लावून मोका लावावा – संदीप खर्डेकर*

*

वैष्णवी हगवणे च्या शरीरावरील जखमा बघता ही हत्या का आत्महत्या असा संशय निर्माण होत असून या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावा, तसेच मोठी सून मयुरी हिची तक्रार असताना देखील कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकारी / कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजप चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच मोठ्या सुनेच्या तक्रारीवर योग्य कारवाई न झाल्याने स्थानिक पोलिसांबाबत जनतेच्या मनात संशय असून हा तपास सी आय डी किंवा अन्य यंत्रणेकडे सोपवावा अशी मागणी देखील श्री. खर्डेकर यांनी केली आहे.
केवळ वैष्णवी किंवा मयुरीचं नव्हे तर अश्या पद्धतीने सासरच्या छळामुळे आत्महत्या केलेल्या सर्व भगिनींना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर आरोपी कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालणे ही शिक्षा सर्वोत्तम असेल.त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील नागरिकांनी, गावकऱ्यांनी, नातेवाईकांनी अशी क्रूर कृत्य करणाऱ्यांवर बहिष्काराचे अस्त्र वापरावे असे आवाहन देखील संदीप खर्डेकर यांनी केले आहे.
तसेच यापुढे हुंडाबळी च्या प्रकरणात मुलीच्या सासरच्यांना “मोका” लावण्याची तरतूद केल्यास जरब बसेल व असे प्रकार घडणार नाहीत किंबहुना असे गैरप्रकार करणारे दहा वेळा विचार करतील असेही संदीप खर्डेकर म्हणाले.
हगवणे कुटुंबातील सर्व नराधमांना कठोरतम शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा अशी मागणी देखील संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments