सध्याच्या हायपर कनेक्टेड जगामध्ये डेटाचा अखंडित लाभ घेता येणे ही एक गरज बनली आहे. कामापासून शिक्षणापर्यंत आणि आरोग्यापासून आरामापर्यंत, जीवनशैलीशी निगडित प्रत्येक गोष्टीमध्ये मोबाईल डेटा महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असल्याने, चिंतामुक्त डेटा अनुभव सध्या सर्वात जास्त केला जात आहे. ही गरज लक्षात घेऊन, भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी वी ने महाराष्ट्र आणि गोव्यात आणला आहे भारतातील पहिला, खऱ्या अर्थाने अनलिमिटेड डेटा प्लॅन* वी नॉनस्टॉप हिरो.
प्रीपेड ग्राहकांसाठी डेटा कोटा समाप्त होण्याच्या समस्येचे निवारण करण्यासाठी, तयार करण्यात आलेला नॉनस्टॉप हिरो प्लॅन संपूर्ण वैधता कालावधीमध्ये चिंतामुक्त डेटा अनुभव मिळवून देण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे.
भारतामध्ये डेटा क्रांती घडून येत आहे. सेंटर फॉर डिजिटल इकॉनॉमी अँड पॉलिसी रिसर्चच्या हल्लीच्या एका अहवालानुसार, भारतामध्ये डेटाचा वापर गेल्या दशकाच्या तुलनेत २८८ पटींनी वाढला आहे. टीआरएआयच्या वार्षिक अहवालानुसार, परवडण्याजोगे स्मार्टफोन्स सर्वत्र उपलब्ध झाले असल्याने, देशभरात इंटरनेट सबस्क्रायबर्सची संख्या मार्च २०२३ मध्ये ८८.१ कोटींवरून मार्च २०२४ मध्ये ९५.४ कोटींवर पोहोचली आणि प्रत्येक युजरचा सरासरी मासिक डेटा वापर मार्च २०२४ मध्ये २०.२७ जीबी होता.
वी नॉनस्टॉप हिरो प्लॅन तीनही रिचार्ज पॅक्समध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल्ससोबत खऱ्या अर्थाने अनलिमिटेड डेटा देऊन, उच्च वेगवान कनेक्टिविटीची वाढती मागणी पूर्ण करतो. ही नवीन ऑफर ग्राहकांना प्राधान्य देण्याची, कोणत्याही मर्यादेविना डिजिटल क्रांतीमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना सक्षम बनवण्याची वी ची वचनबद्धता या नवीन प्लॅनमध्ये दिसून येते.
फक्त ३९८ रुपयांपासून पुढील किमतींना आता महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये वी नॉनस्टॉप हिरो प्लॅन उपलब्ध आहे, ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व रिचार्ज पॅक्समध्ये लाभ देण्यात आले आहेत. या दोन राज्यांव्यतिरिक्त वी नॉनस्टॉप हिरो प्लॅन आंध्र प्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तामिळनाडू, कोलकाता, असम आणि ईशान्य भारत व ओडिशामध्ये देखील उपलब्ध आहेत.
वी नॉनस्टॉप हिरो लाभ पुढील रिचार्ज पॅक्समध्ये उपलब्ध आहेत:
एमआरपी
लाभ
वैधता
३९८
पूर्ण दिवस अनलिमिटेड डेटा + अनलिमिटेड कॉल्स + दर दिवशी १०० एसएमएस
२८ दिवस
६९८
पूर्ण दिवस अनलिमिटेड डेटा + अनलिमिटेड कॉल्स + दर दिवशी १०० एसएमएस
५६ दिवस
१०४८
पूर्ण दिवस अनलिमिटेड डेटा + अनलिमिटेड कॉल्स + दर दिवशी १०० एसएमएस
८४ दिवस
*वी नॉनस्टॉप हिरो हा फक्त व्यक्तिगत उपयोगासाठी आहे आणि कोणत्याही आस्थापनेमध्ये वाणिज्यिक उपयोगासाठी उपलब्ध नाही.
About Vodafone Idea Limited


