एक ग्राहक अनुभव (CX) सेवा पुरवठादार फ्यूजन CX लिमिटेडने प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) द्वारे 1000 कोटी रु. उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे.
डीआरएचपी नुसार, कोलकाता येथे मुख्यालय असलेल्या कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये 600 कोटी रु. च्या इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यू आणि 400 कोटी रु. च्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश आहे. OFS मध्ये प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स, पी एन एस बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड आणि रसीश कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून शेअर्स विक्रीचा समावेश आहे.
फ्यूजन CX फ्रेश इश्यू मधून मिळालेल्या निधीपैकी 292 कोटी रु. कर्जफेडीसाठी, 75 कोटी रु. स्टेप-डाउन सबसिडियरीज – ओमाइंड टेक्नॉलॉजीज इंक आणि ओमाइंड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये IT टूल्स अपग्रेड करण्यासाठी गुंतवणुकीकरता वापरण्याचा प्रस्ताव आहे.
जोडीला निधी अनामिक अधिग्रहणे आणि इतर धोरणात्मक उपक्रमातून साध्य करण्याची इनऑर्गनिक वाढ तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरण्यात येणार आहे.
फ्यूजन CX ही एक ग्राहक अनुभव (CX) सेवा पुरवठादार कंपनी असून उच्च दर्जाच्या, क्लिष्ट आणि एकत्रित CX सेवा अनेक चॅनेल्समार्फत पुरविते. त्यामध्ये व्हॉईस, ईमेल, चॅट, सोशल मीडिया आणि मेसेज यांचा समावेश आहे. टेलिकॉम, हाय-टेक ग्रोथ आणि ट्रॅव्हल, BFSI, रिटेल आणि हेल्थकेअर यांसारख्या महत्त्वाच्या सेक्टर्सवर ती लक्ष केंद्रित करते.
2004 मध्ये स्थापन झालेली Fusion CX कंपनी सखोल डोमेन तज्ज्ञता आणि मालकीच्या AI टूल्सच्या पोर्टफोलिओसह, बहुभाषिक आणि सर्वचॅनेल ग्राहक संवाद मोठ्या प्रमाणावर सक्षम करते. ही संवादक्षमता जनरेटिव AI-चालित तंत्रज्ञानाच्या विस्तृत श्रेणीमुळे प्राप्त होते. त्यामुळे ग्राहक सहभाग, कार्यक्षमता आणि डिजिटल परिवर्तन यामध्ये वाढ होते.
31 डिसेंबर 2024 पर्यंत, कंपनीकडे 15 देशांमध्ये पसरलेल्या 40 डिलिव्हरी सेंटर्ससह एक बहुभाषिक जागतिक नेटवर्क आहे. तिच्या 197 ग्राहकांच्या पोर्टफोलिओमध्ये 22 Fortune 1000 कंपन्यांचा समावेश आहे आणि प्रमुख ग्राहकांमध्ये डीएमईसी कॅपिटल सर्व्हिसेस, टेलएड, अचीव्ह कलेक्शन, अमेरिफ्लेक्स, कोस्टलाइन, अजिओ, मीशो, कॉल कोअर मिडिया, अरविंद फॅशन, प्रॉपन्यू एस.ए., लिओनार्डो हॉटेल्स, इन्शुरन्स एक्सप्रेस, के2 क्लेम्ससर्व्हिसेस सेनट्री क्रेडिट आणि त्राया यांचा समावेश आहे.
आर्थिक बाबतीत, फ्यूजन CX ने आर्थिक वर्ष 24 मध्ये 991 कोटी रु. चे कामकाजामधून महसूल आणि 36 कोटी रु. चा करपश्चात नफा (PAT) नोंदवला, तर आर्थिक वर्ष 25 मध्ये संपलेल्या नऊ महिन्यांसाठी (आर्थिक वर्ष 25 मधील नऊमाही) कंपनीचे उत्पन्न 925 कोटी रु. आणि PAT 47 कोटी रु. होता.
नुवामा वेल्थ मॅनेजमेंट, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसई वर लिस्टिंगसाठी प्रस्तावित आहेत.
डीआरएचपी साठी लिंक:
https://www.bseindia.com/corporates/download/390034/IPO%20Prior/DRHP_20250527101617.pdf


