Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निगची "अर्ली बर्ड" (EARLY BIRD) ऑफर ...

सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निगची “अर्ली बर्ड” (EARLY BIRD) ऑफर सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निगचे २०२५ – २०२६ हे रौप्य महोत्सवी वर्ष

पुणे २८ मे २०२५ – सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निगला २५ वर्ष पूर्ण झाली. या २५ वर्षाच्या यशस्वी प्रवासा निमित्त २०२५ – २०२६ हे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे.

सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निगच्या २०२५ – २०२६ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरु आहेत. या शैक्षणिक वर्षाच्या रौप्य महोत्सवी तुकडी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना “अर्ली बर्ड” (EARLY BIRD) ऑफर देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना पदव्युत्तर डिप्लोमा (PG Diploma) २ वर्ष, पदव्युत्तर प्रमाणपत्र (PG certificate) १ वर्ष, डिप्लोमा (Diploma) १ वर्ष, प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Course) ३-६ महिने, एकल अभ्यासक्रम ( Single Courses) ३ महिने, या अभ्यासक्रमासाठी अर्ज करता येणार आहेत.

या अभ्यासक्रमासाठी ५ जून २०२५ च्या आधी प्रवेश घेणाऱ्यांना “अर्ली बर्ड” (EARLY BIRD) ऑफरची सवलत मिळणार आहे. या अर्ली बर्ड ऑफरचा लाभ घेण्यासाठी (Use Coupon Code: GEBA05062025) या कुपन कोडचा वापर करावा. या कुपन कोडचा वापर केल्यास प्रवेश अर्जामध्ये ५०० /- रुपयांची सूट दिली जाणार आहे. २०२५ – २०२६ या शैक्षणिक वर्षात होणारे प्रवेश हे रौप्य महोत्सवी बॅच ( Silver Jubilee batch ) म्हणून ओळखली जाणार आहे.

प्रवेश घेण्याकरिता ५ जून २०२५ च्या आधी https://applynow.scdl.net/ या वेबसाईटला भेट द्या आणि सवलतीचा लाभ घ्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments