वोडाफोन आयडियाचा एंटरप्राइझ विभाग, वी बिझनेसने हेवलेट पॅकार्ड एंटरप्रायझेससोबत भारतामध्ये धोरणात्मक व्यवस्थापित सेवा करार केल्याची घोषणा केली आहे. आधुनिक व्यवसाय उद्योगांच्या नव्याने निर्माण होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेली नाविन्यपूर्ण आणि भविष्यासाठी सज्ज सोल्युशन्स पुरवण्यासाठी हा करार केला आहे. या भागीदारीमुळे अत्याधुनिक व्यवस्थापित वायरलेस लॅन, स्विचिंग आणि सिक्युरिटी सोल्युशन्स पुरवण्यासाठी एचपीई अरुबा नेटवर्किंग उत्पादनांचा लाभ घेतला जाईल.
कॅम्पस नेटवर्क्स, उत्पादन सुविधा, मोठमोठी कॉर्पोरेट मुख्यालये आणि क्षेत्रीय कार्यालये यांच्यासह विविध प्रकारच्या वातावरणामध्ये एंटरप्राइझ नेटवर्किंग अनुभवांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी ही भागीदारी डिझाईन करण्यात आली आहे. एचपीईचा जागतिक श्रेणीचा नेटवर्किंग पोर्टफोलिओ आणि वीच्या प्रचंड मोठी कनेक्टिविटी व व्यवस्थापित सेवा क्षमता यांना एकत्र आणून या दोन्ही कंपन्या अशी एन्ड-टू-एन्ड सोल्युशन्स प्रदान करतील, जी इंटेलिजंट, पुढे वाढवता येण्याजोगी आणि सुरक्षित असतील.
या करारात समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व सेवांचे संपूर्ण व्यवस्थापन वी च्या नेटवर्क ऑपरेशन्स सेंटरकडून केले जाईल आणि एनओसीचा त्यांना संपूर्ण पाठिंबा असेल. त्यामुळे अखंडित डिलिव्हरी व सक्रिय व्यवस्थापन सुरळीतपणे होईल. इंटेलिजंट ऑर्केस्ट्रेशन आणि सर्वोत्कृष्ट युजर अनुभवांना चालना देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग यांच्या आधारे चालवले जाणारे प्रगत ऍनालिटिक्स आणि सुस्पष्ट डिफाइन्ड सर्व्हिस लेवल ऍग्रिमेंट्स अंतर्गत सर्वसमावेशक इन-लाईफ सपोर्टचा लाभ व्यवसायांना मिळेल.
कॉम्प्युट आणि स्टोरेज क्षमतांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खाजगी डेटा सेंटर्ससाठी सोल्युशन्स विकसित करण्यावर ही भागीदारी लक्ष केंद्रित करेल. यामध्ये खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसायांच्या गरजा पूर्ण केल्या जातील, सुरक्षित, पुढे वाढवण्यायोग्य, सक्षम डेटा पायाभूत सोयीसुविधा देणाऱ्या सरकारी एजन्सीजचा देखील यामध्ये समावेश असेल.
वोडाफोन आयडियाचे चीफ एंटरप्राइझ बिझनेस ऑफिसर, श्री अरविंद नेवतिया म्हणाले, “एचपीईसोबत ही धोरणात्मक भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ही भागीदारी वी बिझनेसचा आयसीटी उत्पादन पोर्टफोलिओ मजबूत करेल, इतकेच नव्हे तर, प्रगत एंटरप्राइझ सोल्युशन्ससह आमच्या मूलभूत टेल्को क्षमता एकत्रित करून आमच्या उत्पादन सेवांमध्ये वाढ करेल. वी बिझनेस आणि एचपीई दोन्ही कंपन्या पुढे वाढवता येतील अशी, सुरक्षित आणि उच्च कामगिरी बजावणारी सोल्युशन्स प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहेत, ही सोल्युशन्स संचालनातील सक्षमतेला चालना देतात, आमच्या व्यवसाय ग्राहकांसाठी डिजिटल परिवर्तन सक्षम बनवतात.”
एचपीई अरुबा नेटवर्किंगचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट आणि जनरल मॅनेजर, फिल मोत्रम यांनी सांगितले, “वी बिझनेससोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे कारण ही भागीदारी म्हणजे भारतामध्ये एंटरप्राईझ नावीन्यामध्ये उचलण्यात आलेले पुढचे पाऊल आहे. एचपीई अरुबा नेटवर्किंगचे इंटेलिजन्स आणि सुरक्षा यांचा मिलाप वी च्या मजबूत कनेक्टिविटी आणि सेवा नैपुण्याशी करून आम्ही गतिमान, सक्षम व भविष्यासाठी सज्ज सोल्युशन्स प्रदान करू जी व्यवसायांना सध्याच्या वेगाने बदलत असलेल्या डिजिटल वातावरणामध्ये आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी सक्षम बनवतील.”
या दोन्ही कंपन्या एकत्र काम करून, व्यवसायांना अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदान करून सक्षम बनवण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित करत आहेत, ही सोल्युशन्स सातत्याने कनेक्टेड होत चाललेल्या जगात गतिशीलता, नावीन्य आणि सातत्यपूर्ण वृद्धी करण्यासाठी व्यवसायांना सक्षम बनवतात.


